बँकेचं कर्ज वाढलं, तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन, धक्कादायक घटनेनं कल्याण हादरलं
कल्याणमध्ये (Kalyan) एक धक्कादायक घटना घढली आहे. कल्याण पूर्वेतील तरुणानं मलंगडच्या कुशिवली गावात आत्महत्या केली आहे.

Thane Kalyan News : कल्याणमध्ये (Kalyan) एक धक्कादायक घटना घढली आहे. कल्याण पूर्वेतील तरुणानं मलंगडच्या कुशिवली गावात आत्महत्या केली आहे. कर्जबाजारी झालेल्या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जीवन संपवलं आहे.
कर्जबाजारी झाल्याची प्राथमिक माहिती
कर्जबाजारी झालेल्या तरुणाने मलंगगडच्या कुशीवली गावात आत्महत्या केली आहे. कल्याण पूर्वेतील संतोषनगरमध्ये राहणाऱ्या किरण परब याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली आहे. आपल्या दुचाकीतील पेट्रोल काढून अंगावर ओतून आत्महत्या केली आहे. किरण आगीत जळत असताना स्थानिकांनी तातडीने उल्हासनगर हिललाईन पोलिसांना प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं परंतु तो पर्यंत किरणचा मृत्यू झाला होता.
खासगी बँकेचे 3 लाख 50 हजारांचे कर्ज
कल्याण पूर्वेतील संतोष नगरमध्ये राहणाऱ्या किरण परब या तरुणाने मलंगगडच्या कुशिवली गावात आत्महत्या केली आहे. त्याच्यावर खासगी बँकेचे 3 लाख 50 हजारांचे कर्ज होते. तर आईच्या दागिन्यांवर देखील त्याने दिड लाखांचा कर्ज घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरण ऑनलाईन गेमिंग खेळून कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला पेटवून घेताना त्याचा मोबाईल देखील जळाला असल्याची माहिती आहे. उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना प्रकाराची माहिती देत मृतदेह शविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:






















