वारी शेवटची ठरली! धाराशिवात वारकऱ्यानं आयुष्य संपवलं; पोलिसांच्या मानसिक छळामुळे टोकाचं पाऊल, नातेवाईकांचा आरोप
पोलिसांच्या मानसिक छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा गंभीर आरोप खडके आमच्या नातेवाईकांनी केलाय.

Dharashiv: संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यात सहभागी होऊन अवघ्या दोन दिवसांपूर्वीच परतलेल्या धाराशिव चा 48 वर्षीय वारकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . चोरीच्या गुन्ह्यात अडकलेल्या मुलाला सोडवण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या त्रासामुळे मानसिक तणावातून वारकरी पित्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे .
काकासाहेब खडके असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वारकऱ्याचे नाव आहे . पोलिसांच्या मानसिक छळामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा गंभीर आरोप खडके आमच्या नातेवाईकांनी केलाय . मृत वारकरी काकासाहेब खडके हे दोन दिवसांपूर्वीच संत तुकाराम पालखी सोहळात सहभागी होऊन परत आले होते .त्यामुळे परिसरात त्यांच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे .
नेमका प्रकार काय?
धाराशिव तालुक्यातील वाघोली गावात 48 वर्षीय वारकऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . काकासाहेब खडके असे मृत वारकऱ्याचे नाव आहे .काकासाहेब यांचा मुलगा धीरज खडके याचा विरोधात सोनसाखळी चोरीचा गुन्हा बार्शी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल केला होता .या प्रकरणात पोलिसांनी धीरजच्या शोधात काकासाहेब खडके यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी बोलावलं होतं .चौकशी दरम्यान बार्शी पोलिसांनी केलेल्या मानसिक छळामुळे वारकरी पित्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे . आरोपी मुलाला आम्ही स्वतः तुमच्या स्वाधीन करतो अशी पोलिसांना विनंती करू नये बार्शी पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली मानसिक छळ करून त्रास दिल्यामुळे वारकरी पित्याने टोकाचे पाऊल उचलले असा आरोप नातेवाईक करत आहेत .
काकासाहेब खडके हे नियमित वारीला जात असत .यंदाही ते पंढरपूरची वारी पूर्ण करून दोन दिवसांपूर्वीच गावी परतले होते . मात्र घरी परतल्यानंतर काही दिवसातच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे .या घटनेनंतर कुटुंबीयांनी बार्शी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहे .आत्महत्या पूर्वी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नसून आत्महत्या मागे नेमकं कारण काय होतं ?याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे .
हेही वाचा























