खासगी-सरकारी वादामुळे अंत्ययात्रेचा अडवला रस्ता, नातेवाईकांचा संताप; मृतदेह खांद्यावर घेऊन अर्धा तास ताटकळले
ठाण्याच्या दिवा परिसरातील बेडेकर नगरजवळील पाटील टॉवर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठाणे : मृत व्यक्तीचे पार्थिव एखाद्या गल्लीतून, रस्त्यावरुन जात असेल तर आजुबाजूची लोकंही उभे राहून किंवा हात जोडून अखेरचा निरोप देतात. मृत्य व्यक्तीबाबत शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली जाते. मात्र, अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या अंत्ययात्रेला (Thane) एका रस्त्याचा वादाचा सामना करावा लागला. त्यामुळे, चक्क अंत्ययात्रेतील (Funeral) नातेवाईकांना अर्धा तास एकाच जागी थांबावे लागले. स्थानिकांनी हा रस्ता त्यांच्या खासगी जागेतून जात असल्याचा दावा करत येथील रस्त्यावर बॅरिकेड्स आणि गेट उभारले आहे. त्यामुळे, मृतदेह खांद्यावर घेऊन नातेवाईक तब्बल अर्धा तास ताटकळत उभे राहिले. अखेर संतप्त नागरिकांनी गेटचे कुलूप तोडून अंत्ययात्रेसाठी मार्ग मोकळा केला.
ठाण्याच्या दिवा परिसरातील बेडेकर नगरजवळील पाटील टॉवर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज विशाल वाघ या तरुणाच्या निधनानंतर त्याची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेत असताना रस्त्यावर उभारलेल्या गेटमुळे अंत्ययात्रेला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप नातेवाईक आणि स्थानिकांनी केला. मृतदेह खांद्यावर घेऊन नातेवाईक तब्बल अर्धा तास ताटकळत उभे राहिले होते. अखेर संतप्त नागरिकांनी गेटचे कुलूप तोडून अंत्ययात्रेसाठी मार्ग मोकळा केला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता ठाणे महानगर पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी उभारला असताना या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला जात आहे. अखेर संतप्त नागरिकांनी गेटचे कुलूप तोडून अंत्ययात्रेसाठी मार्ग मोकळा केला. ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी विकसित केलेला रस्ता आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही स्थानिकांनी हा रस्ता त्यांच्या खासगी जागेतून जात असल्याचा दावा करत त्यावर बॅरिकेड्स आणि गेट उभारले आहे. महापालिकेचा रस्ता की खासगी मालमत्ता, या वादामुळे आता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj






















