एक्स्प्लोर

तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; गुटखा विक्रेत्यांवर आता मकोका लागणार, FDI च्या अधिकाऱ्यांनाही इशारा

तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे.

मुंबई : राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी सांभाळताच, कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या महिनाभरात तुकाराम मुंढेंनी एकापाठोपाठ एक कारवाया करत 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतरही राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री होत असल्याने आता आयुक्त मुंढे आणखी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता, उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांवर मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे तुकाराम मुंढेंनी म्हटलं. 

तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. वर्तमानपत्रात -खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशी सक्त ताकीदही खाद्यविक्रेत्यांना देण्यात आली आहे. आता, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्कविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 (मकोका) लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंनी निर्देश दिले आहेत. उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. मकोका गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपीचा इतिहास पाहून आवश्यक त्या गुन्ह्यानुसार कारवाई केली जाणार, असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवून, वाहतूक , वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटीत नेटवर्क विरोधात मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढेंकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही संघटित गुन्हेगारी आहे, त्यामध्ये विक्री करणारा आणि विकत घेणारा देखील जबाबदार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, यामध्ये आमचे काही अधिकारी देखील इनवॉल्ड आहेत, असे आरोप होत आहेत. मात्र, याची देखील चौकशी आम्ही करतोय, अधिकारी जर सहभागी असल्याचे आढळले तर तुम्हाला सांगण्यात येईल, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच मुंढेंनी दिला आहे. 

3 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर 25 मे ते 11 जून या कालावधीत प्रतिबंधक गुन्ह्यामध्ये 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये, 35 जणांवर गुन्हे दाखल असून 350 जणांना अटक करण्यात आली आहे.  

मला कुठलीही धमकी नाही, तो व्हिडिओ जुना

दरम्यान, मला कोणतीही धमकी आली नाही, मला धमकी आल्यासंदर्भातील तो व्हीडिओ जुना असून कदाचित पुण्यातला असेल, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी स्वत: आजच्या पत्रकार परिषदेत दिली.
 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Chembur Accident Report: चेंबूर दुर्घटना अहवालावरून पुन्हा सत्ताधारी विरुद्ध प्रशासन आमनेसामने; अहवाल आधी माध्यमांत गेल्याने संताप, तर महापौर रितू तावडे म्हणल्या कि...
चेंबूर दुर्घटना अहवालावरून पुन्हा सत्ताधारी विरुद्ध प्रशासन आमनेसामने; अहवाल आधी माध्यमांत गेल्याने संताप, तर महापौर रितू तावडे म्हणल्या कि...
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Embed widget