मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा E- Mail, सिनेगॉग चौकातील ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा दावा
पोलीस यंत्रणा सज्ज असून बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. ठाणे पोलिसांचा शोध कार्य सुरू, घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त केला आहे.
ठाणे : मुंबईनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेला ठाणे दहशतवाद्याच्या निशाण्यावर (Thane Terrorist Attack) आले आहे. ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांचं प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ठाणे पोलिसांना इमेल आला आहे. प्रार्थना स्थळ प्रशासनाला अज्ञात मेलवरद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना दिल्या आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज असून बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. ठाणे पोलिसांचा शोध कार्य सुरू, घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त केला आहे.
गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास प्रार्थना स्थळ प्रशासनाला अज्ञात हा धमकीचा मेल आला आहे. मेलमध्ये मोठा घातपात होणार असल्याचा दावा केला. ठाण्यातील सिनेगॉग चौक हा वर्दळीचा रस्ता आहे. मेल आल्यानंतर संबधित प्रार्थना स्थळाच्या कर्मचाऱ्याने तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. Funing असे धमकी देणाऱ्या ग्रुपचे नाव आहे. तपास सुरू असून अद्याप पथकाल काही आढळून आले नाही.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
ई-मेल प्राप्त होताच, आरोपींनी ज्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता त्याठिकाणी तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. पण या शोध मोहिमेत अद्याप काही आक्षेपार्ह आढळलं नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु झालाय. हा ई-मेल कुणी केला, त्याचा उद्देश काय होता, याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.
आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी
दोनच दिवसापूर्वी आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी आली होती. ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई मेल आला. त्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून (Khilapat India) धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक वेळा धमकीचे फोन
मुंबई पोलिसांना यावर्षी अनेक अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे कॉल आले आहेत. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने ताज हॉटेल बाँबने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता.
हे ही वाचा :