एक्स्प्लोर

Thane Road Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर भीषण अपघात, डंपरखाली सापडून तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे, समोरचं दृश्य पाहून लहान भाऊ जागेवरच थिजला

Thane Accident News: आई दीदीच्या शरीराचे दोन तुकडे झालेत, असे भावाने सांगताच आई धावत गेली. ठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या भीषण अपघातात गजल तुटेजाचा मृत्यू.

Thane Road Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर नागला बंदर परिसरात रविवारी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. येथील कॅडबरी जंक्शनजवळ ही तरुणी दुचाकीवरुन जात असताना ती डंपरखाली (Dumper Accident) आली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. गजल टुटेजा असे या तरुणीचे नाव होते. ती घोडबंदर (Ghodbunder road) परिसरातील एका सोसायटीत राहत होती. गजल तुटेजा रविवारी रात्री 10 वाजता येथील पेट्रोल पंपाजवळून जात असताना डंपरने तिला चिरडले. गजल ही तिच्या कुटुंबातील एकटी कमावणारी होती. तिच्या मृत्यूमुळे घोडबंदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Thane News)

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून घोडबंदर रोडची अवस्था, रस्त्यांची झालेली चाळण आणि वाहतूक कोंडीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. गजलचा अपघात झाला त्या नागला बंदर परिसरात डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. येथील रस्ताही प्रचंड वर-खाली आणि येथे खूप खड्डे आहेत. त्यामुळे गजलचे स्कुटीवरील नियंत्रण सुटून ती डंपरखाली गेल्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून वर्तविली जात आहे.

डंपर अंगावरुन गेल्याने गजलच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. गजलच्या मृतदेहाला कोणीही हात लावण्यासाठी तयार नव्हते. तिचा भाऊ आणि आई घटनास्थळी आल्यानंतर आईने एका चादरीत गजलचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवला. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिने जागेवरच प्राण सोडले.

Horrific Road Accident: 'दीदीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते'; गजलच्या भावाने सांगितली अंगावर काटा आणणारा प्रसंग

गजल तुटेजा ही ठाण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होती. तिला वडील नसल्यामुळे घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. तिच्या घरात आई आणि लहान भाऊ होता. घराचा गाडा ओढण्यासाठी गजल ही नोकरीसोबत पोळीभाजीचा व्यवसायही करायची. प्रचंड कष्ट करुन तिने आपल्या घराचा आर्थिक गाडा रुळावर आणला होता. गजलचा तिच्या लहान भावावर प्रचंड जीव होता. 12 तारखेल अपघाताच्या दिवशी गजलने तिचा भाऊ अक्की याला बाहेर जेवायला जाऊ असे सांगितल होते. मी दोन मिनिटांत घराच्या खाली येतेय, तू खाली ये, आपण मस्त जेवायला जाऊयात, असे गजल म्हणाली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गजलचा अपघात झाला.

गजलचा भाऊ अक्की याने रस्त्यावर पडलेला आपल्या बहिणीचा मृतदेह पाहिला. तो पेट्रोल पंपाजवळ बहिणीची वाट पाहत होता. तेव्हा त्याला रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली. तिथे जाऊन पाहिल्यानंतर अक्कीला त्याच्या बहिणीचा मृतदेह दिसला. त्याने सांगितले की, 'मी खाली गेलो, दिदीला खूप फोन लावले, पण तिने फोन उचलला नाही, थोडे पुढे गेलो तेव्हा तिथे गर्दी दिसली मी त्या गर्दीतून वाट काढत गेलो. तेव्हा मला दिसले की, दीदीच्या अंगावरुन डंपर गेला होता तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. मी लगेच आईला फोन केला', असे अक्की तुटेजा याने सांगितले. 

आणखी वाचा

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली अन्...; नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget