एक्स्प्लोर

Thane : ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर, अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं भोवलं

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना 45 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असून त्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

ठाणे : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) अधिकाऱ्याला भोवलं आहे. कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर (Subodh Thanekar) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ स्तरावर आदेश देऊनही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मानसिकता ठाणेकर यांनी दाखवली नसल्याने त्यांना 45 दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या आतापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांबाबत सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. तर त्यांचा प्रभारी कार्यभार कार्यालयीन अधीक्षक सोपान भाईक यांच्याकडेर सोपवण्यात आला आहे.

कळवा हॉस्पिटलमधील मृत्यूकांड, दोन अधिकारी निलंबित

ठाणे महापालिकेच्या  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकच दिवशी झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी दोन अधिकारी निलंबित करण्यात आले आहे. तर चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.  13 ऑगस्ट 2023  रोजी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

13 ऑगस्ट 2023 रोजी कळवा हॉस्पिटल मधील 18 रुग्ण दगावल्यानंतर कळवा हॉस्पिटल मधील प्रशासनावरती एकच ठपका ठेवण्यात आलेला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तपासणीचे आदेश दिल्यानंतर एक कमिटी देखील चौकशी गठीत करण्यात आली होती. या कमिटीच्या माध्यमातून जबाबदार डॉक्टरांकडून त्या संपूर्णपणे प्रकरणाची कारणे विचारण्यात आली होती. या कमिटीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विभाग आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त, आरोग्य सेवानिर्देशक मुंबई, सहाय्यक निर्देशक आदी अधिकारी होते. कमिटीने लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते. त्यातच याच मृत्यूकांडाबद्दल हिवाळी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता.

कळवा हॉस्पिटल मधील 18 जणांच्या मृत्यूकांड प्रकरणावरून कळवा हॉस्पिटलमधील दोन वरिष्ठ अधिकारी आणि दोन ज्युनिअर डॉक्टर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार पाहायला मिळते. एबीपी माझाच्या बातमीमुळे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली होती. त्यामुळे चौकशी समिती बसून आज कारवाई झाली.

रुग्णालयाच्या त्रुटींबाबत वेधलं लक्ष

अहवालात कोणावर ठपका ठेवण्यात आला नसला तरी रुग्णालयांच्या त्रुटींबाबत मात्र या चौकशी समितीनं प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. रुग्णालायाबाबत नेमक्या काय सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत? याबाबत कोणी बोलायला तयार नाही. चौकशी समितीनं सुचवलेल्या सुधारणांबाबत तरी प्रशासनाकडून अंमलबजावणी होणार का? याबाबतही साशंकता आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget