Viral News: दहावीत एका विद्यार्थाला मिळाले चक्क 35 टक्के,पालकांचा आनंद गगनात मावेना
नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. जाहीर झालेल्या निकालात अनेकांनी चांगले गुण मिळवले. मात्र, एका मुलाने करेक्ट 35 टक्के गुण मिळवले.
![Viral News: दहावीत एका विद्यार्थाला मिळाले चक्क 35 टक्के,पालकांचा आनंद गगनात मावेना ssc result 2023 son paasd with 10th board exam with 35 percent family celebration news education viral news marathi Viral News: दहावीत एका विद्यार्थाला मिळाले चक्क 35 टक्के,पालकांचा आनंद गगनात मावेना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/2876eb3f38074418abc79d8b1e30b6e91686243454053704_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral News : अलीकडेच महाराष्ट्रातील दहावी बोर्डाचे निकाल (ssc result) घोषित करण्यात आले. या निकालाची सर्वात जास्त धास्ती पालकांना असते. बहुतांश पालकांना अपेक्षा असते की, त्यांच्या मुलांनी परीक्षेत उत्तम गुणांनी पास व्हावे. सध्याचा काळ तर प्रचंड स्पर्धात्मक आहे. जर मुलांनी पालकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही,तर त्यांना प्रचंड रागवलं जातं. काही पालक तर मुलांना घालून-पाडून बोलतात. पण जगात असेही पालक आहेत जे आपल्या मुलांना कमी गुण मिळाले तरी पेढे, जिलेबी वाटतात. असाच आनंद ठाण्यातील एका कुटुंबाने साजरा केला. या कुटुंबातील मुलाने 35 टक्के गुण मिळवले.
महाराष्ट्रातील दहावी बोर्डाच्या परीक्षेचे नुकतेचं निकाल घोषित करण्यात आले होते. यानंतर एका पालकांनी जेव्हा आपल्या मुलांचा निकाल तपासला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या मुलाने दहावीत 35 टक्के गुण प्राप्त केले होते.या मुलाने सर्व विषयामध्ये चक्क 35 गुण मिळविले. मुलाने अत्यंत परिश्रमाने हे गुण मिळविल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले आहे. सर्व सामान्यपणे इतके गुण मिळाल्यानंतर पालक कानऊघडणी करतात. अशावेळी बऱ्याच पालकांना अपमानजक वाटते. पण मुंबईतील एका पालकांनी मुलांने 35 टक्के गुण घेतल्यानंतरही जोरदार आनंद साजरा केला आहे.
Video | Vishal Ashok Karad could barely manage 35 marks minimum required for passing SSC exam, but the family celebrated as if he had topped the board. Vishal, a student of Shivai Vidyalay in Uthalsar, Thane has scored unique 35 marks in each subject, His father is a Rickshaw… pic.twitter.com/5lDkW9BRJW
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) June 2, 2023
दहावीच्या परीक्षेत मिळविले 35 टक्के गुण
विशाल अशोक कराडे या विद्यार्थाने दहावीत चक्का 35 गुण मिळविले आहेत. त्याने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. सध्या तो ठाण्यात राहायला आहे. विशालचे वडिल ऑटो रिक्षा चालवतात आणि आई एक घर काम करते. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे,यासाठी हे पालक प्रचंड काबाडकष्ट करताना दिसून येतात.
पालकांचा उत्साह पाहून होतंय कौतुक
विशालच्या वडिलांनी मुंबईच्या एका चॅनेलशी बोलताना सांगितले की, अनेक पालक आपल्या मुलांनी चांगले गुण घेतल्यामुळे धुमधडाक्यात आनंद साजरा करतात. परंतु आमच्या विशालने मिळविलेले 35 टक्के गुण आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्याने दहावीची परीक्षा पास केली आहे. याविषयी एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद. एसएससी पास करणारा तो कुटुंबातील पहिला सदस्य असेल. हा कुटुंबियासाठी अत्यंत अभिमानस्पद क्षण आहे.’ विशालच्या आई-वडिलांचा उत्साह पाहून सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केलं जातं आहे.
वाचा इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)