Uddhav Thackarey : 'सरकारचा जन्मच खोक्यातून झाला आहे', ठाण्यातील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Uddhav Thackarey : ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ठाकरे गटाकडून उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केले आहे.
Uddhav Thackarey : 'जे एकमेकांमध्ये भेद करतात त्याला हिंदुत्व नाही म्हणत', असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यातील (Thane) उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केले आहे. गडकरी रंगायतनविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'एक सभेत बाळासाहेबांना चिठ्ठी आली ठाण्यात नाट्यगृह नाही. त्यानंतर आम्ही ठाण्याला नाट्यगृह दिलं.' पण सध्या इथे काही वेगळीच नाटकं सुरु आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला.
सरकारचा जन्मच खोक्यातून : उद्धव ठाकरे
खोक्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या सरकरावर निशाणा साधला आहे. तर 'ज्या सरकाराचा जन्मच खोक्यातून झाला आहे ते आम्हाला काय सांगतात' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'ही परीक्षा कठीण आहे, त्यामुळे यामध्ये लढणारे खरे शिवसैनिक आहेत.' सरकारकडून सतत उद्धव ठाकरे यांनी काय केलं असा सवाल विचारत त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 'मी जर काही केलं नसतं तर तुम्ही इथे का आला असता. ते जो काही प्रश्न विचारत आहेत त्याचं उत्तर तुम्हीच देणार आहात.'
'मी संविधानाच्या आधारावर शपथ घेतली'
'मी देखील मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण मी संविधानाच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मी तेव्हा म्हटलं होतं की मी कोणासोबतही भेदभाव करणार नाही', असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांवर देखील निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मी काँग्रेससोबत सरळ मार्गाने गेलो, अर्ध्या रात्री बैठका करुन नाही गेलो.'
उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली आहे. सगळे भ्रष्टाचारी भाजपला लागतात असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'बाहेर असेल तर मळ आणि भाजपत आलं की कमळ'. तुमचं कमळ फुलवायला तुम्हाला भ्रष्टाचारीच लागतात का असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे. इतिहासातील एकमेव असा दीर्घकाळ टिकलेला भाजप आणि शिवसेनेचा जोड होता, तो भाजपनेच आधी तोडला असल्याचा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
'मणिपूरच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींचं मौन का?'
मणिपूरमध्ये जो हिंसाचार सुरु आहे त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. यावर राष्ट्रपती महिला असून त्यांचं मौन का असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तर मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणतात अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत, तुम्हाला असं बोलताना लाज वाटली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
VIDEO : Uddhav Thackeray Thane: 'आजा मेरी गाड़ी में बैठ जा; भाजपचा नारा' ठाकरेंचा भाजप आणि शिंदेंवर हल्लाबोल