एक्स्प्लोर

Ranjeetsingh Naik Nimbalkar : काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न, काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये येतील; खासदार निंबाळकरांचा गौप्यस्फोट 

Ranjeetsingh Naik Nimbalkar : लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील, असा दावा  माढा लोकसभेचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.

Ranjeetsingh Naik Nimbalkar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस आमदारांमध्ये (Congress Mla) अस्वस्थता आहे. त्यामुळं लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील, असा दावा  माढा लोकसभेचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  (MP Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी केलाय. काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सहभागी होतील, असाही गौप्यस्फोट देखील खासदार निंबाळकर यांनी केला आहे.

काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जावून काँग्रेसचे नुकसान होईल अशी त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले. माढा विधानसभा मतदारसंघातील श्रीपूर ते खंडाळी या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे  लोकार्पण खासदार निंबाळकर यांच्या आणि माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

मोहिते पाटलांची कार्यक्रमाला अनुपस्थिती, चर्चांना उधाण

दरम्यान, श्रीपूर ते खंडाळी या रस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम हा माळशिरस तालुक्यात असूनही मोहिते पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा निंबाळकर मोहिते वादाच्या चर्चेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे विरोधक समजले जाणारे राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हजर होते. मात्र, मोहिते पाटील यांनी त्यांच्याच तालुक्यात झालेल्या या विकासकामांच्या उद्घाटनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.        

उजनी धरणाचे फेर पाणीवाटप करणे गरजेचे 

उजनी धरणाचे फेर पाणीवाटप करणे गरजेचे असल्याचे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.  ज्याच्या हाती ससा तो पारधी या म्हणीप्रमाणे उजनीचे पाणी कोणीही फोन करुन हवे तसे नेत असल्याचा आरोप खासदार निंबाळकर यांनी केला. उजनीच्या फेरपाणीवाटपाबाबत आमदार बबनदादा शिंदे यांनी मागणी केल्यानुसार याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे निंबाळकरांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी भाजप खासदार निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्याचे सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Leader Of Opposition : पावसाळी अधिवेशन संपायला आले, तरीही काँग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याची निवडच नाही!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thackeray vs Eknath Shinde : ठाकरे-शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, पण एकमेकांना का टाळलं? जाणून घ्याABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 10 March 2025Eknath Shinde - Uddhav Thackeray पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाहीAjit Pawar On Ladki Bahin : 2025-26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद : अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, काय आहे नियम?
Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय?
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
'या' कारणांनी थंडगार फ्रीजमध्ये होऊ शकतो 'स्फोट'
Embed widget