Shiv Sena: शिवसेना ठाकरे गटाची पदाधिकारी अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण; कळव्यातील घटना
Shiv Sena Ayodhya Pol: शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला.

Ayodhya Pol: शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. ठाणे-कळवा (Thane Kalwa) मनिषा नगर भागात ही घटना घडली. एका कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. मात्र, हा कार्यक्रम एक बनाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर पोळ यांना पुन्हा काही महिलांनी मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. मात्र, शाईफेक करत पोळ यांना मारहाण कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या प्रकारावरून ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचे म्हटले जात आहे.
सोशल मीडियावर अयोध्या पोळ या शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडत असतात. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडण्यात त्या आघाडीवर होत्या. शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
कळवा मनीषा नगर जय भीम नगर भागात अहिल्या देवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर त्यांना मारहाण करत अंगावर मोठ्या संख्येने धावून आल्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अयोध्या पोळ यांना हा ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून आमंत्रण देण्यात आले होते.
अयोध्या पोळ यांच्यासाठी सापळा?
अयोध्या पोळ यांनी हजेरी लावलेला कार्यक्रम हा शिवसेना ठाकरे गटाचा असल्याचे सांगत त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, हा ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून सापळा रचण्यात आला असल्याचे शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, खासदार राजन विचारे, शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे देखील या कार्यक्रमास येणार असल्याचे भासून पोळ यांना देखील आमंत्रित केले असल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अयोध्या पोळ कोण आहेत? Who Is Ayodhya Pol
अयोध्या पोळ या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय आहेत. शिवसेनाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर नमूद केले होते. मागील वर्षी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर पोळ यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या त्या आक्रमकपणे बाजू मांडतात.
अयोध्या पोळ पाटील या मूळच्या परभणी जिल्ह्यातील आहेत. गेली 12 वर्षांपासून त्या मुंबईतच राहतात. त्यामुळे परभणीत त्या सक्रीय नाहीत. अयोध्या पोळ यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
