एक्स्प्लोर

पहाटे सहापर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याना खड्डे दिसत नाहीत का ? राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा 

Rajan Vichare : पहाटे सहा वाजेपर्यंत काम करत असलेल्या ठाणेकर मुख्यमंत्र्याना शहरातील खड्डे दिसत नाहीत का ?, एकनाथ शिंदेंना राजन विचारेचा सवाल

Rajan Vichare : ठाणे शहारत अनेक भागात खड्डे पडले असून कोपरी पुलावर ही खड्याचे साम्राज्य पसरले आहे, पण पहाटे सहा वाजेपर्यंत काम करत असलेल्या ठाणेकर मुख्यमंत्र्याना शहरातील खड्डे दिसत नाहीत का ? असा सवाल उध्दव गटातील खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारत शिंदेंवर निशाणा साधला आहे. ठाणे शहारत पडलेल्या खड्यामुळे सामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून मुंबई प्रवेशद्वार जवळ असलेल्या कोपरी पुलावर काही दिवसापूर्वी खड्यामुळे एकाला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे कोपरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी कोपरी पुलाचा पाहणी दौरा केला. दरम्यान या पाहणी दौऱ्यात रेल्वेचे मुख्य प्रकल्प अभियंता लक्ष्मण लोलगे, एम एम आर डी ए चे प्रकल्प अभियंता सुर्वे, ठाणे महानगरपालिकेचे अभियंता धनंजय मोदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वेर्णेकर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर सकाळी आणि संध्याकाळी कोपरी रेल्वे पुलाच्या अरुंद मार्गिका असल्याने वाहतूक कोंडीमुळे होणारा खोळांबा टाळण्यासाठी या पूलाचे रुंदीकरणाचे काम एम एम आर डी ए मार्फत सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील चार मार्गिका तयार होऊन 9 ऑक्टोंबर 2021 रोजी याचा लोकार्पण सोहळा संपन्न होऊन नागरिकांसाठी खुला केला गेला. पण दुसऱ्या टप्प्यातील 4 मार्गिका सुरू करण्यासाठी जुना रेल्वे पुल तोडण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यामुळे रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस भराव भरण्याचे काम तत्काळ सुरु करा, असे विचारे यांनी एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांना बजावले. तसेच काही दिवसापूर्वी या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे विनीत भालेराव या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात दोषींवर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित त्यांनी केला. ही बाब अतिशय गंभीर असून या तरुण युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयास कोणत्याही मदतीचा हात किंवा विचारपूस  प्रशासनाकडून न मिळाल्याची खंत खासदार विचारे यांनी व्यक्त केली. त्या तरुणाच्या कुटुंबियांस नोकरी किंवा आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. तसेच शहारातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच शहरांतून इतर राज्यात जाणाऱ्या महामार्गावर देखील खड्डे पडलेले असल्याचे दिसून येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करत आहेत? शिंदे सहा वाजेपर्यत काम करतात मग त्यांना खड्डे का दिसत नाहीत? नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयन्त करावेत असा चिमटा विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला. 

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget