एक्स्प्लोर

Gadkari Rangayatan : गडकरी रंगायतनचं रुपडं पालटणार! नूतनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून 8 कोटींचा निधी मंजूर

Gadkari Rangayatan Renovation : गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने दिला आठ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्या सल्ल्याने नूतनीकरण होणार आहे.

Ram Ganesh Gadkari Rangayatan Renovation : ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाचं नूतनीकरण होणार आहे. गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने दिला आठ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

गडकरी रंगायतनचं रुपडं पालटणार

गडकरी रंगायतनमध्ये रंगकर्मींना तसेच प्रेक्षकांना काही असुविधा जाणवत होत्या. त्याबद्दल, तक्रारी आणि सूचना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेही नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रंगायतनच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आलं. यामध्ये मूळ वास्तू सुस्थितीत असून अंतर्गत रचना आणि सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचं स्पष्ट झालं. 

गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी सरकारकडून निधी मंजूर

त्याप्रमाणे, गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले. सन 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची 2005 मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता 18 वर्षांनी नूतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता 1080 एवढी आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आठ कोटींचा निधी मंजूर

गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाईल. तसेच, काळानुरुप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. 

रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्या सल्ल्याने नूतनीकरण होणार

गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना कलाकार आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षा समजून त्यानुसार अंतर्गत सुविधांची रचना केली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नूतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा,  शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले. 
 
रंगायतनच्या तारखांचे बुकिंग लक्षात घेवून नूतनीकरण कामे केली जातील. जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही. तसेच, कमीत कमी कालावधीत काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाईल, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

प्रमुख कामांचा समावेश

  • संपूर्ण रंगरंगोटी
  • स्ट्रक्चरल सुधारणा 
  • आवश्यक स्थापत्य कामे
  • प्लिंथ प्रोटेक्शन
  • नवीन आसनव्यवस्था
  • रंगमंच, पडदा, फ्लोरिंग, विंग्स यांचे नूतनीकरण
  • पार्किंग व्यवस्था सुधारणा, फॉल सिलिंगचे काम
  • तालीम हॉलचे नूतनीकरण
  • अग्निसुरक्षा व्यवस्था नूतनीकरण
  • शौचालयांचे नूतनीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Thackeray Vs Shinde Rada: मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Embed widget