एक्स्प्लोर

Thane : मतदारांच्या यादीत घोळ, भिवंडीतील आमदाराचा प्रांत कार्यलयात जमिनीवरच ठिय्या

भिवंडी पूर्वेतील समजावादीचे आमदार रईस शेख यांनी प्रांत कार्यलयात जमिनीवर खाली बसून ठिय्या मांडला, मतदार यादीतील घोळावरुन ते चांगलेच संतापले होते.

Thane: भिवंडी उप-विभागीय कार्यलयात मतदार नोंदणीसाठी (Voter Registration) आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमणात गैरसोय होऊन नोंदणी करताना असुविधेचा फटका बसत असल्याच्या तक्रारी भिवंडी (Bhiwandi) पूर्वेतील समजावादीचे आमदार रईस शेख यांच्याकडे आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी गुरुवारी (8 जून) थेट उप-विभागीय कार्यलय गाठलं. मात्र त्यावेळी उप-विभागीय अधिकारी सानप हे कार्यलयात उपस्थित नसल्याचं पाहून त्यांनी कार्यालयातच जमिनीवर बसून ठिय्या मांडला होता. 

आगामी भिवंडी महापालिका निवडणुकांसह (Palika Election) विधानसभा (Vidhan Sabha) , लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) नव्याने मतदार नोंदणी भिवंडीतील उप-विभागीय कार्यलयात सुरु आहे. मात्र याठिकाणी नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत असतो, काही मतदारांची तर अपुऱ्या माहितीवरच नोंदणी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार शेख यांनी केला आहे. विशेष म्हणजे या कार्यलयात नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने शेकडो नागरिक तासनतास  ताटकळत उभे राहून आपले कार्यलयीन कामकाज उरकून घेतात. 

यापूर्वी आमदार शेख यांनी या संदर्भात पत्रव्यवहार करून उप-विभागीय अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली होती. मात्र त्यांच्या पत्रव्यवहाराने शासनाच्या कामकाजात काहीच फरक पडला नाही, असं आमदार शेख यांनी सांगत अचानक कार्यलयात जाऊन जमिनीवरच ठिय्या मांडला.  यावेळी त्यांनी पुन्हा बोगस मतदार आणि मृत मतदारांची नावं यादीतून वगळ्यात यावी, अशी मागणी देखील आमदार शेख यांनी केली. त्यानंतर एका तासाने उप-विभागीय अधिकारी सानप हे कार्यलयात आले. त्यावेळी त्यांनी आमदारांशी चर्चा करून त्यांचे पुन्हा निवेदन स्वीकारले आणि तीन महिन्याच्या आत मतदार यादीतील घोळ निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिलं, त्यामुळे आमदार शेख यांनी आपलं ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित केलं, मात्र तीन महिन्यानंतरही मतदार यादीतील घोळ असाच कायम राहिला तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा आमदारांनी दिला आहे.

दरम्यान, भिवंडी उप-विभागीय कार्यलयात दलालाचाच राबता असून याठिकाणी आल्यावर दलालामार्फत पैसे देऊन अनेकांची कामं एका झटक्यात होत असल्याने हे कार्यालय आता दलालाच्या ताब्यात आहे की काय? असा प्रश्न आमदार शेख यांनी उपास्थित करून खळबळ उडवून दिली आहे. यानंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का? हा एक प्रश्नच आहे.

हेही वाचा:

Corruption In Maharashtra: राज्यात चिरीमिरी जोरात; 377 जणांना रंगेहाथ पकडले...9 प्रकरणात आरोप सिद्ध...12 जणांना शिक्षा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
हृदयद्रावक !  4 वर्षांचं  बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
हृदयद्रावक ! 4 वर्षांचं बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
गावच्या पारावर ओबीसी आरक्षणावरून निराशा, नातवाच्या नोकरीच्या चिंतेनं तडक शेत गाठलं अन्.., बीडमध्ये खळबळ
हृदयद्रावक !  4 वर्षांचं  बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
हृदयद्रावक ! 4 वर्षांचं बाळ नाल्यात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह आईसमोर, आक्रोशानं गोंडेगाव सुन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर
अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर
जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज
जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज
बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
राहुल गांधी केस का करु शकत नाहीत? डिसेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने कायद्यातच असा बदल की निवडणूक आयुक्तांविरुद्ध मृत्यूपर्यंत कोणताच खटला चालवू शकत नाही, केरळ काँग्रेसने कायदा दाखवला
राहुल गांधी केस का करु शकत नाहीत? डिसेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने कायद्यातच असा बदल की निवडणूक आयुक्तांविरुद्ध मृत्यूपर्यंत कोणताच खटला चालवू शकत नाही, केरळ काँग्रेसने कायदा दाखवला
Embed widget