एक्स्प्लोर

Eknath Shinde : 'ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील', ठाकरे गट - समाजवादी पक्षाच्या युतीवर मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

Maharashtra Politics : ते सगळ्यांसोबत युती करतील त्यांच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबई : ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गट (Thackeray Group) आणि समाजवादी पक्षाच्या युतीवर टीकास्त्र सोडलं. अनेक दशकांच्या दुराव्यानंतर पुन्हा शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी समाजवादी जनता पक्षासोबत संवाद साधला. रविवार (15 ऑक्टोबर) रोजी मुंबईतील एम.आय.जी. क्लबमध्ये ठाकरे गट आणि समाजवादी पक्ष यांची संयु्क्त बैठक पार पडली. याच बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी संवाद साधलताना टीकास्त्र सोडलं. 

त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली - मुख्यमंत्री शिंदे

'जेव्हा त्यांनी काँग्रेससोबत युती केली तेव्हाच त्यांचं हिंदुत्व कळालं. त्यांनी त्याचवेळी बाळासाहेबांच्या विचारांना देखील तिलाजंली दिली. महाराष्ट्रातील जनेतची देखील त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या हिंदुत्वाविषयी बोलू नये. ज्यांना ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील,' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

खेळ आणि राजकारण एकत्र आणू नये

ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करु शकता मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर अडचण काय? असा सवाल उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलतना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'त्यांनी खेळ आणि राजकारण याची गल्लत करु नये. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.' 

घरी बसलेल्यांना कोणाही मतदान करत नाही

उद्धव ठाकरे यांनी भाजपने लोकांचा भ्रमनिरास केला असल्याचं वक्तव्य त्यांच्या भाषणादरम्यान केलं. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं की, 'येणाऱ्या निवडणुकीत मतदार दाखवून देतील. मतदार सुज्ञ आहेत. घरात बसलेल्यांना कोणीही मतदान करत नाही. मागील नऊ वर्षांमध्ये ज्यांनी विकास केला आहे आणि जो विकास केलाय त्याला लोक मत देतील.' 

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तर यावेळी त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणादरम्यान आम्ही समाजवादी पक्षासोबत युती केली तर काय बिघडलं असा सवाल उपस्थित केला, तर यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही असं म्हणत उत्तर दिलं. 

हेही वाचा : 

Uddhav Thackeray : 'सत्ता नसताना जे बरोबर येतात तेच चिरकाल टिकतात', संयुक्त बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
Embed widget