महारेरा घोटाळ्यात संबंधित शेतकरी नाही बिल्डरला अटक करा, इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट संघटनेची मागणी
महारेरा फसवणूक प्रकरणात अधिकाऱ्यांचा समावेश, महारेरा घोटाळ्याचे तक्रारदार संदीप पाटील यांना पोलीस संरक्षण द्या
kalyan latest news in marathi: महारेरा घोटाळा प्रकरणात केडीएमसीचे सर्वेअर, टाऊन प्लॅनरसारखे अधिकारी सामील आहेत. एकेका अधिकाऱ्याचे दोन दोन बांधकामे सुरू आहेत, यांसर्वांची नावे ईडी आणि आयकर विभागाला दिली आहेत. या अधिकाऱ्यांच्या दबावामुळे तक्रारदाराला सुरक्षा दिली जात नाही असा आरोप द इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट संघटनेने आज पत्रकार परिषदेत केला. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत ठोस निर्णय घ्या, संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करा, या प्रकरणातील तक्रारदार संदीप पाटील यांना लवकरात लवकर सुरक्षा द्या व शेतकऱ्यांपेक्षा बिल्डरवर कारवाई करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
द इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ आर्कटेक्चस संघटनेच्या वतीने आज कल्याण डोंबिवली शहरात उघड झालेला महारेरा फसवणूक प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी या संघटनेच्या सदस्यांनी तक्रार संदीप पाटील यांनी हा इतका मोठा घोटाळा उघड केला, मात्र त्यानंतर संदीप पाटील यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून त्यांना अद्याप पोलीस संरक्षण देण्यात आलेले नाही. याबाबत संघटनेकडून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्यापही काहीच उत्तर आलेले नाही.. इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा उघड झाला, बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलाय. यामधील केडीएमसीचे बनावट सही शिक्का बनवनाऱ्या पाच जणासह चार बिल्डर्सला देखील बेड्या ठोकण्यात आल्यात मात्र या प्रकरणी आणखी जलद गतीने कारवाई होणे अपेक्षित होते मात्र अद्यापही कागदी घोडे नावचवण्या पलीकडे काही ठोस कारवाई करण्यात आलेले नाही.
याआधी झालेल्या एन ए घोटाळ्यातील आरोपी या प्रकरणात देखील आरोपी आहे मात्र अद्याप त्याला अटक नाही .गेल्या दोन महिन्यात अवघ्या नऊ जणांना अटक करण्यात संबंधित यंत्रणेला यश आले मात्र अद्यापही उर्वरित पन्नासहून अधिक जण मोकाट फिरत आहेत.. संबंधित अधिकाऱ्यांवर देखील आता काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेचे काही अधिकारी देखील या प्रकरणात सहभागी आहेत त्यांची नावे मी इडी व आयकर विभागाला दिल्याच्या तक्रार संदीप पाटील यांनी सांगितले.या संबंधित बिल्डरने शासनाचेच नव्हे तर नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक केले त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे हा घोटाळा उघडकीस आणून देणाऱ्या संदीप पाटील यांना पोलीस संरक्षण देखील दिले पाहिजे अशी मागणी या संघटनेच्या वतीने आज करण्यात आली.