(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi Fire : भिवंडीत केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग; पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
Bhiwandi Fire : भिवंडीत दापोडे (Dapode) ग्रामपंचायतीच्या हद्दीत केमिकलच्या ड्रमने भरलेल्या एका ट्रकला (Truck) अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
Bhiwandi Fire : भिवंडीत आगीचे (Bhiwandi Fire) सत्र काही थांबताना दिसत नाही. तालुक्यातील दापोडे (Dapode) ग्रामपंचायतीच्या हद्दीत केमिकलच्या ड्रमने भरलेल्या एका ट्रकला (Truck) अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी मोठी आणि भीषण होती की, ट्रकमध्ये केमिकल ड्रमचे मोठे स्फोट झाले. आग लागल्याचे समजतात चालकाने ट्रकमधून उडी मारल्यानं मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
पेटलेले ड्रम चायनीजच्या दुकानात पडल्यानं दुकानाचं मोठं नुकसान
आग लागल्यामुळं ट्रकमध्ये केमिकल ड्रमच्या स्फोट होत होते. स्फोटामुळं हे ड्रम हवेत उडून परिसरात कोसळत होते. हे ड्रम एका चायनीजच्या दुकानात येऊन पडल्यानं दुकानाचंही मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, ट्रकला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. काही वेळातच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी रस्त्यावरील दोन्ही बाजूचे मार्ग थांबवण्यात आले होते. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: