मोठी बातमी : कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळली, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू; 2 जण जखमी
Kalyan School wall collapses : कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर दोन लहान मुलं जखमी झाले आहेत.

Kalyan School wall collapses : कल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळून (Kalyan School wall collapses) मोठी दुर्घटना घडलीये. या दुर्घटनेत एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अन्य काही लहान मुलं जखमी झाले आहेत. कल्याणमधील केबीके इंटरनॅशनल स्कूलची ही भिंत आहे. यामध्ये दोन मुलं जखमी (Kalyan School wall collapses) झाल्याची माहिती समोर आली आहे. अंश राजकुमार सिंह (वय 11)असं मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु
अधिकची माहिती अशी की, कल्याण बाल्यांनी केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर दोन लहान मुले जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. शाळेजवळ मुलं खेळत असताना अचानक भिंत कोसळली.
शाळेच्या संचालकांनी दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना
शाळेजवळ काही लहान मुलं खेळत होती. याचवेळी अचानक केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळली आहे. यावेळी तेथेच खेळत असलेल्या अंश कुमार सिंह याचा मृत्यू झाला तर सोहेब शेख (वय 6) आणि अभिषेक सहानी (वय 10) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. वारंवार शाळेकडे स्थानिकांनी भिंत दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. मात्र मुजोर शाळेच्या संचालकांनी दुर्लक्ष केल्याने आज मोठी दुर्घटना घडली. शाळेची भिंत कोसळल्याने दोन मुल गंभीर जखमी झाले असून एकाचा यात मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























