एक्स्प्लोर

Manikrao Kokate: ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंची वक्तव्यावर सारवासारव; म्हणाले, 'तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढलात...'

Manikrao Kokate: मी तसं बोललोच नाही, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे, असंही माणिकराव कोकाटे म्हणालेत.

Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे पुन्हा एकदा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर कृषीमंत्री कोकाटे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा कृषीमंत्र्यांवरती टीका होऊ लागली आहे. दरम्यान, कोकाटेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी तसं बोललोच नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाले कोकाटे?

स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे म्हणाले, मी तसं बोललोच नाही, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे. काही ठिकाणी कांद्याची लागवड केल्याने, कांद्याचे नुकसान झाला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये शेतीमध्ये माल कमी आहे. जेवढं नुकसान झाला आहे, तेवढे पंचनामे करण्याचे सांगितले असून, नुकसान भरपाई देणार आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नांगरलं आहे, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरटी करावीच लागते. आता सोयाबीन, कापूस शिल्लक आहे का?, त्यामुळे फळबागा उभा आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत असं कोकाटे म्हणालेत.

तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढता

तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वेगळा काढता. ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही, त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार? कांदे आणि फळ पिकाचे पंचनामे करण्यासाठी सांगितलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालं आहे, त्या शेतीचं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ज्या पिकांची नुकसान होईल त्या पिकाची नुकसान भरपाई शासनातर्फे दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात मालच नाही त्याचे पंचनामे कसे करायचे. जे काही खरं आहे ते मी बोललो आहे. ठीक आहे चुकलं असेल, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढत आहात. मी काही वेगळं बोललेलं नाही जे सत्य आहे,तेच बोललो आहे. मी तसं काही बोललोच नाही, या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्याबाबत मी बोललो आहे,असंही पुढे सारवासारव करताना माणिकराव कोकाटे म्हणालेत.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते. 

नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे? 

यावेळी पत्रकारांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी पत्रकारांनी नुकसानीच्या संदर्भात विचारले असता नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, शेतात जी काही पिके असतील त्यांचे रीतसर पंचनामे केले जातील असेदेखील माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget