Kalyan : हौस मौज करण्यासाठी महागड्या सायकल चोरायचे, वॉचमनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Cime News : खडकपाडा पोलिसांनी महागड्या सायकल चोरीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी वॉचमनला अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे.
Kalyan Latest Crime News : कल्याणमधील खडकपाडा पोलिसांनी महागड्या सायकल चोरीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी त्यांनी एका वॉचमनला अटक केली आली आहे. यामध्ये सायकल चोरीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे.
कल्याण खकडपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार महागड्या सायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. अखेर या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसाना यश आले. या प्रकरणी एका हाय प्रोफाईल सोसायटीतील वॉचमनला अटक करण्यात आली आहे. संड्रिक एबिनिझर असं या वॉचमनचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे दोन लहान मुले महागडया सायकल चोरायचे व हा वॉचमन या महागडय़ा सायकल विकत होता. हौस मौज करण्यासाठी हे महागड्या चोरी करत असल्याचे सांगितलं. आतापर्यंत पोलिसांनी 14 महागड्या सायकल जप्त केल्या आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायकल चोरीचा प्रकार वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. या गुह्यांचा तपास सुरू असताना सायकल चोरी करतानाचं एक सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. या सीसीटिव्हीमध्ये एक अल्पवयीन तरुण सायकल चोरताना दिसत होता. डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील, पीआय शरद झीने, पोलीस अधिकारी नितिन आंधळे आणि अनिल गायकवाड यांच्या पथकाचा तपास सुरू झाला. कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेलजवळ पोलिस गस्त घालत असताना एक अल्पवयीन मुलावर पोलिसाना संशय आला. सीसीटिव्ही फुटेज तपासलं असता हा तोच मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एका उच्चभ्रू सोसायटीतील दोन मुले महागड्या सायकल चोरी करत होते. ते राहत असलेल्या सोयायटीतील वॉचमनच्या मदतीने या सायकली ते विकत होते. या पैशातून ते हौस मौज करत होते. या प्रकरणी सॅड्रीक एबीनिझर या वॉचमनला अटक करण्यात आली. त्या वॉचमनकडून 14 महागडय़ा सायकल हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दोन मुले ही अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर प्रक्रियेनुसार कारवाई होणार आहे.