बहिणाच्या मायेची अनोखी गोष्ट, थेट स्वत:च काळीजचं दिलं अन् भावाने केली नव्या आयुष्याची सुरुवात
Kalyan - Dombivali News : काही कारणांमुळे माधुरी यांच्या भावाचे लिव्हर पूर्णपणे खराब झाले होते. त्यासाठी त्यांना तातडीने लिव्हरची गरज होती. त्यावेळी माधुरी यांनी त्यांचे लिव्हर देण्याची तयारी दाखवली.
कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांच्या बंधुप्रेमाची सर्वत्र चर्चा आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पोलीस (Police) खात्यात कार्यरत असणाऱ्या माधुरी यांच्या भावाचे लिव्हर पूर्णपणे खराब झाले होते. भाऊ मरण यातना सहन करत होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. पण त्यांना लिव्हर कुठे मिळत नव्हते. त्यावेळी त्या भावाच्या मदतीला बहिण धावून आली आणि तिचे लिव्हर भावाला दिले.
मानवी शरीरातील लिव्हर हा भाग अर्धा काढला तरी त्याची पुन्हा वाढ होते. त्यामुळे जवळपास 60 ते 65 टक्के आपलं लिव्हर आपण दुसऱ्याला देऊ शकतो. अशीच गोष्ट माधुरी काळे आणि त्यांच्या भावासोबत घडली. आपल्या काळजाचा तुकडा भावाला दान करून भावाला जीवदान दिले .त्यांनी आपल्या भावाला 65 टक्के लिव्हर दिले. पेशंटचे संपूर्ण लिव्हर काढून दुसऱ्या माणसाच्या लिव्हरचा भाग त्याठिकाणी बसवणे ही अतिशय कठिण अशी शस्रक्रिया असते.
बहिणीचे मोलाचे धाडसं
जी व्यक्ती लिव्हर देण्यास तयार असते, तिला देखील अनेक प्रकारच्या चाचण्यांमधून जावे लागते. आपल्या काळजाचा तुकडा काढून देणं ही एवढी सोपं गोष्ट नाही, तरीही माधुरी यांनी हे धाडस दाखवले आहे. या शस्रक्रियेनंतरही अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. पण माधुरी यांनी या कोणत्याच गोष्टीचा विचार केली नाही, त्यांनी फक्त आपल्या भावाच्या आयुष्याचा विचार केला. त्यामुळे त्यांच्या भावाला नवं आयुष्य मिळालं.
काही कारणांमुळे माधुरी यांच्या भावाचे लिव्हर पूर्णपणे खराब झाले होते. त्यासाठी त्यांना तातडीने लिव्हरची गरज होती. त्यावेळी माधुरी यांनी त्यांचे लिव्हर देण्याची तयारी दाखवली. सुदैवाने ही शस्रक्रिया यशस्वी देखील झाली. यामुळे माधुरी यांच्या बंधुप्रेमाने अनोखं उदाहरण घालून दिलं.
माधुरी काळे या ह्या पेशाने शिक्षिका आहेत. तर मागील 15 वर्षांपेक्षा जास्त काळ त्या कल्याण- डोंबिवली महानगरपालिकाच्या विजयनगर – आमराई या परिसरातील वेगवेगळ्या प्रभागातून सातत्याने नगरसेविका म्हणून काम करत आहे. लॉकडाऊन काळातही त्यांनी अत्यंत मोलाचे काम केले. त्यांचे नियोजनबध्द काम कल्याणकराच्या कायम लक्षात राहील असं सांगण्यात येतं. सध्या या बंधुप्रेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.