Uddhav Thackeray : नाशिकच्या आधी शिवनेरीला जाणार, 22 तारखेची महाआरती राष्ट्रपतींच्या हस्ते करणार; डोंबिवलीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Uddhav Thackeray: अटल सागरी सेतूच्या कार्यक्रमावेळी केवळ मोदींचाच फोटो लावण्यात आला होता, त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींचाही फोटो लावण्यात आला नव्हता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
ठाणे: भाजपने राष्ट्रपतींना मान दिला नसला तरी आम्ही तसं करणार नाही, येत्या 22 जानेवारीला नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते महाआरती करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिकला जायच्या आधी शिवनेरीत जाऊन शिवमंदिराचे दर्शन घेणार असल्याचंही ते म्हणाले.
या आधीच्या मंदिरांची प्रतिष्ठापणा ही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आली आहे, मग आताच राम मंदिरातील श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापणा ही राष्ट्रपतींच्या हस्ते का करण्यात येत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. भाजपने राष्ट्रपतींना जरी मान दिला नसला तरी आम्ही तसं करणार नाही, 22 जानेवारी रोजी नाशिकमध्ये काळाराम मंदिरातील महाआरतीचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या हस्ते करणार असून त्यासाठी त्यांना निमंत्रण देणार असल्याचंही ठाकरे म्हणाले. डोंबिवलीमध्ये शाखा भेटीच्या दरम्यान त्यांनी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवडी न्हावा शेवा महामार्गावरील अटल सागरी सेतूच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमावेळी केवळ नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला होता. त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींचाही फोटो लावण्यात आला नव्हता. आम्ही मात्र तसं करणार नाही. राम मंदिराच्या कार्यक्रमाला या सरकारने राष्ट्रपतींना आमंत्रण दिलं नाही. पण आम्ही 22 जानेवारीच्या नाशिकच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देणार आहोत. त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते नाशिकमध्ये आरती करणार. त्यावेळी केवळ त्यांचाच फोटो लागणार असून आमचा कुणाचाही फोटो लावण्यात येणार नाही."
अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राममूर्तीची नाही, तर राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे. देशाच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे. ह्यावेळी राष्ट्रपतींना अयोध्येत आमंत्रित करावं. आम्ही काळाराम मंदिरात जी आरती करणार आहोत, त्यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थित राहावं, अशी आम्ही पत्राद्वारे मागणी करीत आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
आम्ही सुद्धा नाशिकला काळाराम मंदिर येथे दर्शन करणार आहोत, कार्यक्रम करतो आहोत, त्याला सुद्धा राष्ट्रपती यांना आम्ही रितसर निमंत्रण देत आहोत. आमचे खासदार रितसर निमंत्रण देतील. राष्ट्रपती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी, अशी आमची मागणी आहे. याआधी सुद्धा तसा झालं आहे.
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपलं हिंदुत्व वेगळं आहे. भाजपला आपण हिंदुत्वामुळं सोडलं नाही, त्यांच्या ढोंगापणामुळे सोडलं. देशाला वाचवण्यासाठी रामभक्त एकत्र आले. राम मंदिराचा लढा कित्येक वर्षांचा आहे. आता त्याचं श्रेय मात्र हे सरकार घेत आहेत.
शिवनेरीला जाणार
राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी 22 जानेवारीला नाशिकला जाणार आहे, पण त्या आधी आपण शिवनेरीला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, अयोध्येला जायच्या आधी आपण शिवमंदिराची माती घेऊन गेलो होतो, त्यानंतर एका वर्षाच्या आत राम मंदिराचा निकाल लागला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या 22 तारखेला दिवाळी साजरी करा असं आवाहन केलं आहे. पण त्याच्या आधी यांनी गेल्या 9 वर्षात काय दिवाळं काढलंय त्यावर चर्चा करा. तुमच्यामध्ये जर काही आत्मविश्वास असेल तर त्यावर चर्चा करा. तुमच्या योजनांचं काय झालं त्यावर चर्चा करा
चोराच्या हाती धनुष्यबाण, शिवसैनिकाच्या हाती मशाल, आता या गद्दारांची घराणेशाही गाढली पाहिजे. या भगव्याला कलंक लावणारी औलात पुन्हा वळवणार नाही हे पाहा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही बातमी वाचा: