Diwali Bonus : कल्याण डोंबिवली मनपाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, बोनसरुपी यंदा मिळणारी रक्कम किती?
Diwali Bonus : कल्याण डोंबिवली महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे.
![Diwali Bonus : कल्याण डोंबिवली मनपाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, बोनसरुपी यंदा मिळणारी रक्कम किती? Diwali Bonus 2023 Kalyan Dombivali Municipal Corporation declare diwali bonus for Employee Diwali Bonus : कल्याण डोंबिवली मनपाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, बोनसरुपी यंदा मिळणारी रक्कम किती?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/06/389be74f73c29699e1cde7eba32ca9721699278189029290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : दिवाळीसाठी (Diwali 2023) काही दिवस शिल्लक असताना आता बोनसही जाहीर (Diwali Bonus) होऊ लागला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त वगळता सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला आहे.
दिवाळी निमित्ताने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांचा जल्लोष
कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बोनससाठी विशेष प्रयत्न केले होते. त्याला यश मिळाले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त वगळता सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. बोनसच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्तांचे आभार मानत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला.
बीएमसी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार का?
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी, 7 नोव्हेंबर रोजी बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22 हजार ते 30 हजारांदरम्यान बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी बेस्टसहित बीएमसी कर्मचाऱ्यांना 22, 500 रुपयांचा बोनस मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)