(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anandacha Shidha : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सावळा गोंधळ, 100 रुपयांचा आनंदाचा शिधा 300 रुपयांना
Anandacha Shidha : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 100 रुपयाच्या रेशन किटचा काळाबाजार; एका किटची 300 रूपयात विक्री
Anandacha Shidha Latest News : डाळ, साखर, रवा आणि एक लिटर तेल पिशवी या वस्तू पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीतून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं याची घोषणा केली होती. गुरुवारपासून राज्यभरात या आनंदाच्या शिधाचं वाटप सुरु झालं आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिवळीमध्ये 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. काही जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा पोहचलाय तर काही जिल्ह्यामध्ये अद्याप विलंब झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी आनंदाचा शिधा पोहचला नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच 100 रुपयांच्या आनंदाच्या शिधासाठी 300 रुपये घेतले जात असल्याचं वास्तव समोर आले आहे.
100 रुपयांच्या किटची ठाण्यात 300 रुपयांना विक्री केली जात आहे. एकनाथ शिंदे सरकारने गाजावाजा करीत दिवाळीत गोरगरीबांना 100 रुपयाची रेशन किट (आनंदाचा शिधा) स्वस्त धान्य दुकानातत उपब्लध करून दिली. मात्र मुख्ममंत्र्यांच्या जिल्हातच गोरगरीब आदिवासी रेशनधारकांकडून 300 रूपयात विक्री होत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात होत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे केली तक्रार दाखल करण्यात आली आहे. तहसीलदराकडे तक्रार करून कारवाईची मागणी केल्याने दिवाळी किटचा काळाबाजार उघडकीस आला आहे.
शिंदे सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयांच्या किमतीमध्ये आनंदाचा शिधा म्हणून किट स्वस्त धान्य दुकानातून देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शासकीय धान्य गोदामात वस्तू स्वस्त धान्य दुकानांवर उशिरा का होई ना पोहचल्या. मात्र शाहपूरमधील स्वस्त धान्य दुकानदाराने 100 रूपयाची धान्याची किट 300 रूपयाला विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फुगाळा ,आगनवाडी येथील स्वस्त धान्य दुकानात घडली आहे. या दुकानाचा मालकाने 100 रूपयाची धान्याची किट 300 रूपयाला विक्री करत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी शहापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत गोरगरिबांचे दिवाळे काढणाऱ्य या दुकानदारावर स्थानिक प्रशासन काय कारवाई करते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.