एक्स्प्लोर

ठाण्यातील मुब्रामध्ये विचित्र अपघात, सिमेंट मिक्सर वाहन सोसायटीमध्ये पलटी, एका मुलाचा मृत्यू, 7 जखमी

Thane Mumbra Accident : ठाण्यानजिकच्या मुंब्रा परिसरात एका सिमेंट मिक्सर वाहनाचा विचित्र अपघात झाला. अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला.

Thane Mumbra Accident : ठाण्यानजिकच्या मुंब्रा परिसरात एका सिमेंट मिक्सर वाहनाचा विचित्र अपघात झाला. अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. सिमेंट मिक्सर वाहनाच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर एका सोसायटीची संरक्षण भिंत तोडून उलटला. या अपघातात सात मुलंही दुर्दैवीरित्या जखमी झाल्याचं समजतेय. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनींही रात्री घटनेचा आढावा घेतला. दरम्यान, अपघात झालेला सिमेंट मिक्सर वाहनाला पोलीस कर्मचाऱ्यांकडून हायड्राच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम करण्यात आले.

आरएमसी व्हॅनचा तोल जाऊन सोसायटीच्या आवारात कोसळल्याने सात लहान मुलं गंभीर जखमी तर एका तरुणाचा मृत्यू झाला.  मुंब्रा येथील सम्राट नगर येथे ही घटना घडली. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या खडी सिमेंट मिक्स करणाऱ्या आर एम सी व्हॅनचा अपघात शनिवारी रात्री घडला. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार करण्यात आलेत.  अपघात झाल्यानंतर आरएमसी व्हॅन चालक फरार झाला. घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव झाला होता. 

मुंब्रातील सम्राट नगर परिसरात शनिवारी रत्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुंब्रा बायपासवरून सम्राट नगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर सिमेंट मिक्सर वाहनाच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. वाहनचालकाचा ताबा सुटल्याने मिक्सर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाला. या  अपघातामध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू  झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह तसेच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अग्निशमन दलाचे जवान , इमर्जन्सी टेंडर , रेस्क्यु वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित झाले. या घटनेत मिक्सर पलटी झाल्याने सात स्थानिक रहिवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.  

या घटनेत ६ जण जखमी..

१)  विशाल सोनावणे (पु/ २५ वर्षे / प्राईम हॉस्पिटल, मुंब्रा येथे दाखल करण्यात आले आहे.) 
२) अशिक इनामदार (पु / 15 वर्षे / गौतमी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.)
३) प्रभाकर सलियान (पु / ४८ वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.)
४)  अब्दुल वफा (पु/ ५० वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.)
५) फरीद शेख (पु / ५४ वर्षे / बुरहानी हॉस्पिटल, मुंब्रा)
६) आशा दाधवड (स्त्री / ५८ वर्षे / बुरहानी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.)

या घटनेमध्ये १ मृत व्यक्ती

१) नासिर शेख (पु / १४ वर्षे / छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केल्यानंतर मृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं, नेमकं काय घडलं?
पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत; बिहार कनेक्शनपाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर, दोन शिक्षक ताब्यात
नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत; दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघातTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 23 June 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 23 June 2024Manoj Jarange on Chhagan Bhujbal : जातीय वाद झाले तर भुजबळ जबाबदार - मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं, नेमकं काय घडलं?
पुण्यात भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत; बिहार कनेक्शनपाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर, दोन शिक्षक ताब्यात
नीट पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत; दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
Horoscope Today 23 June 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
T20 World Cup 2024 :  सेमी फायनलमधील दोन संघ आजच निश्चित होणार,सुपर 8 मध्ये कोणते संघ आघाडीवर 
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोणते संघ जाणार? दोन टीम आज निश्चित होणार
Horoscope Today 23 June 2024 : कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कुंभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; मकर, मीन राशीने घ्यावी फक्त एका गोष्टीची काळजी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Murlidhar Mohol VIDEO : मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
मुंडे साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं, आज ते असायला हवे होते; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत मुरलीधर मोहोळ भावुक
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
भारताच्या विजयाचे 5 शिल्पकार; कुलदीपची फिरकी, बुमराहचा भेदक मारा अन् हार्दिकचा अष्टपैलू टच!
Embed widget