एक्स्प्लोर
हेलिओ X20 प्रोसेसर, 4GB रॅम... ‘स्पीड 8’ लॉन्च

मुंबई : झोपोने भारतात आज आपला नवा स्मार्टफोन ‘स्पीड 8’ लॉन्च केला. हा स्मार्टफोन ऑनलाईन स्टोअर स्नॅपडीलवरुन खरेदी करता येणार आहे. 29 हजार 999 रुपये या स्मार्टफोनची किंमत आहे. हेलियो X20 डेका-कोर प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम ही या स्मार्टफोनची वैशिष्ट्यं आहेत. स्पीड 8 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले असून, 1080 रिझॉल्युशन पिक्सेल आहे. अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आहे. फोटोग्राफीसाठी 21 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, NFC, USB टाईप-C पोर्ट आणि फिंगरप्रिंट स्कॅनर फीचर्स आहेत. फास्ट चार्जिंगसाठी 3600 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
आणखी वाचा























