Apple AirPods ला टक्कर देण्यासाठी ZOOOK सज्ज, Rocker Twins ईयरपॉड्स भारतात लॉन्च!
भारतीय बाजारपेठेत फ्रान्सची कंपनी ZOOOK ने आपले नवे ईयरपॉड्स Rocker Twins लॉन्च केले आहेत. या ईयरपॉड्सचे वैशिष्ट्य हे आहे की याच्या ब्लू टूथची रेंज 10 मीटरपेक्षा जास्त आहे.
नवी दिल्ली: भारतात उच्च प्रतिच्या साऊंड क्वॉलिटीची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारपेठेत फ्रान्सची कंपनी ZOOOK ने आपले नवे ईयरपॉड्स Rocker Twins लॉन्च केले आहेत. या ईयरपॉड्सचे वैशिष्ट्य म्हणजे याची ब्लूटूथ रेंज 10 मीटरपेक्षा जास्त आहे.
ZOOOK चे ट्रु वायरलेस इन ईयर हेडफोन Rocker Twins ला ब्लूटूथ v5.0 च्या शानदार कनेक्टिव्हिटीसोबत लॉन्च करण्यात आले आहे. यात अॅपल सीरिज सोबतच गुगल असिस्टंटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच यात 500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीचा बॅकअप हा 10 तास इतका आहे. बॅटरी सपोर्टच्या मदतीने 100 तासांच्या स्टँडबाय बॅकअपचा दावा करण्यात येत आहे.
ZOOOK चे ट्रु वायरलेस इन ईयर हेडफोन Rocker Twins ला गोल्डन आणि सिल्व्हर या दोन रंगात लॉन्च करण्यात आले आहेत. याची किंमत 3,499 इतकी आहे तर ऑफरमधून याची खरेदी 1,699 रुपयात खरेदी केली जाऊ शकते. हे ईयरपॉड्स ऑनलाईन तसेच ऑफलाईन खरेदी करता येऊ शकतात. भारतीय बाजारपेठेत ZOOOK Rocker Twins ची सरळ स्पर्धा ही Apple AirPods शी आहे.
Apple AirPods Apple AirPods मध्ये नव्या विशेष चिपची सुविधा देण्यात आली आहे. यात नव्या डिजाइनच्या H1 चिपचा वापर करण्यात आला आहे. हा नवा एयरपॉड आपल्याला जास्त टॉकटाईम देतो म्हणजे याच्या मदतीने आपण 50 टक्के जास्त टॉकटाईम प्राप्त करु शकता. स्टॅन्डर्ड चार्जिंग केसची किंमत 14,9000 रुपये इतकी आहे तर वायरलेस चार्जिंगची किंमत 18,900 रुपये इतकी आहे. ज्या ग्राहकांना हा वायरलेस चार्जर खरेदी करायचा आहे ते 7500 रुपयातही त्याची खरेदी करु शकतात. यामध्ये Qi कॉम्पिटिबल चार्जिंग सोल्यूशनचा वापर करण्यात आला आहे जे आपल्याला वायरलेस चार्जिंगची सुविधा देते.
महत्वाच्या बातम्या:
- Hyundai i20 Turbo DCT Automatic review: जाणून घ्या का खरेदी करायची नवीन Hyundai i20?
- PUBG गेम भारतात पुन्हा सुरु होणार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता
- WhatsApp मध्ये पेमेंट सेटअप अॅक्टीव कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
- New Hyundai i20 first look review: पाहता क्षणी पसंतीस पडेल नवीन Hyundai i20, काय आहेत वैशिष्ट्ये?