एक्स्प्लोर

Amravati Municipal Corporation Election 2026 : भाजपचं रवी राणांच्या युवा स्वाभिमानशी जुळलं, मॅजिक फिगरसाठी अडलं; काँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी, अमरावतीत महापौर कोणाचा?

Amravati Election 2026 अमरावती : अमरावती महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी बहुमत असलेल्या भाजपसह काँग्रेसलाही मित्रपक्षांचा आधार घावा लागणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा हालचाली सुरू केल्या आहे.

Amravati Municipal Corporation Election 2026 अमरावती : अमरावती महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी बहुमत असलेल्या भाजपसह काँग्रेसलाही मित्रपक्षांचा आधार घावा लागणार आहे. या स्पर्धेच्या आणि महापालिकेच्या चाव्या आपल्या पक्षाला मिळाव्या यासाठी हालचालींना मोठा वेग आला आहे. एकीकडे अमरावतीकरांनी भाजपच्या बाजुने स्पष्टपणे जनादेश दिलेला नाही. भाजपचे अवघे 25 नगरसेवक निवडून आले असून त्या खालोखाल युवा स्वाभिमान पक्षाचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा 15 जागांवर मुसंडी मारली असून MIM ने देखील 12 ठिकाणी दमदार कामगिरी करत एकंदरीत अमरावतीचे सत्ताकारण बदलवलंय. त्यामुळे आकड्यांची जुळवा-जवळकरत महापालिकेवर कुणाची सत्ता? येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Amravati Election Result 2026)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप सध्या युवा स्वाभिमान सोबत जाणार, असं चित्र असलं तरी मॅजिक फिगर 44 आहे. भाजप 25 आणि युवा स्वाभिमान 15 असे मिळून 40 जागाच होताय. त्यामुळे सत्तास्थापणेला अजून 4 जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे बसपाच्या तीन जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे बसपा सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा हालचाली सुरू केल्याअसून काँग्रेस मित्रपक्षांना सोबत घेऊन महापौर बसवण्याचा तयारीत आहे. काँग्रेस 15 जागेवर विजयी झाला तर राष्ट्रवादी युवा स्वाभिमानमुळे भाजप सोबत जायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला, MIM ला आणि बसपा, उबाठा, वंचित आणि शिवसेना नेते अडसूळ जे राणाच्या विरोधात आहे त्यांना सोबत घेऊ शकते. एकंदरीत राजकीय समीकरण पाहता कोणाचं सूत जुळतं, आणि अमरावती महापालिकेत कोणाचा महापौर विराजमान होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमरावती महापालिकेचं राजकीय समीकरण (Amravati Municipal Corporation Election Result 2026)

काँग्रेस - 15

MIM - 12

राष्ट्रवादी - 11

शिवसेना - 3

शिवसेना उबाठा - 2

बसपा - 3

वंचित - 1

एकूण -- 47

जिथे युवा स्वाभिमान पक्ष आहे तिथे आम्ही सोबत नाही : संजय खोडके (Sanjay Khodke on Ravi Rana)

दुसरीकडे, जिथे युवा स्वाभिमान पक्ष आहे तिथे आम्ही सोबत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी घेतलीय. निकालाची प्रक्रिया सुरू असतानाच स्थानिक स्तरावर कुणाशीही चर्चा करू नका, असे निर्देश पार्टीकडून आले आहेत. मात्र, भाजपासोबत चर्चा करत असाल तर स्थानिक स्तरावर युवा स्वाभिमान पार्टीसोबत आम्ही सत्तेत राहणार नाही, असा निरोप आम्ही वरिष्ठांना कळवला आहे. जिथे युवा स्वाभिमान सोबत भारतीय जनता पार्टी राहील तिथे आम्ही सोबत राहणार नाही, हे मी मागील एक वर्षापासून सांगत आहे.

मुस्लिम समाजामध्ये आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश, प्रतिसाद मिळाला नाही. ज्या आमच्या चांगल्या जागा होत्या तेथील मुस्लिम समाजाचं मतदान देखील काँग्रेसच्या बाजूने गेलंय. काही भागात काँग्रेसपेक्षा आमची परिस्थिती चांगली होती. म्हणून ओवेसींनी आम्हाला टार्गेट केलं आणि त्याचा फटका आम्हाला बसला. असेही आमदार संजय खोडके म्हणाले. भाजपने देखील, आम्ही मुस्लिम महापौर बसवणार, असा प्रचार केला. त्यामुळे त्याचा फटका देखील आम्हाला बसला असल्याचेही ते म्हणाले.

आणखी वाचा 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
Embed widget