एक्स्प्लोर
सर्व मोबाईलवर भरघोस सूट, शाओमीचा दिवाळी सेल
27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणाऱ्या या सेलमध्ये अनेक लोकप्रिय फोनसह इतर वस्तूंवरही सूट देण्यात आली आहे. 27 ते 29 सप्टेंबर या काळात हा सेल असेल.
मुंबई : शाओमीच्या 'दिवाळी विथ Mi' सेलला उद्यापासून सुरुवात होत आहे. शाओमीच्या Mi.com या वेबसाईटवर 27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणाऱ्या या सेलमध्ये अनेक लोकप्रिय फोनसह इतर वस्तूंवरही सूट देण्यात आली आहे. 27 ते 29 सप्टेंबर या काळात हा सेल असेल.
शाओमी रेडमी नोट 4, रेडमी 4, रेडमी A4, Mi मॅक्स 2 या फोनसह नुकत्याच लाँच झालेल्या Mi A1 या फोनवरही सूट देण्यात येणार आहे. तर पॉवर बँक आणि हेडफोन्सवरही सूट असेल. शाओमीच्या वेबसाईटवर सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व वस्तूंची यादी देण्यात आली आहे.
रेडमी नोट 4 (3GB व्हेरिएंट) 9999 रुपयात
शाओमीकडून रेडमी नोट 4 च्या 3GB रॅम व्हेरिएंटवर एक हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. या फोनची मूळ किंमत 10 हजार 999 रुपये आहे. मात्र ग्राहकांना सेलमध्ये हा फोन 9 हजार 999 रुपयांमध्ये मिळेल. तर याच फोनचं 4GB व्हेरिएंट, ज्याची किंमत 12 हजार 999 रुपये आहे, हा फोन 10 हजार 999 रुपयात मिळेल. पेटीएमद्वारे हा फोन खरेदी केल्यास 400 रुपयांचा कॅशबॅकही मिळेल.
रेडमी 4 वर 1500 रुपयांची सूट
शोओमीने रेडमी 4 च्या तिन्हीही व्हेरिएंटवर 1500 रुपये सूट देण्याची घोषणा केली आहे. या फोनची किंमत 6 हजार 999 रुपयांपासून सुरु होते. त्यामुळे ग्राहकांना या फोनच्या तिन्हीही व्हेरिएंटवर 1500 रुपयांची सूट मिळेल.
हेडफोनवर सूट
Mi हेडफोनवर 300 रुपयांची सूट मिळेल. या हेडफोनची मूळ किंमत 2 हजार 999 रुपये आहे. मात्र तुम्हाला हे हेडफोन 2 हजार 699 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. तर Mi इअर फोनवरही सूट मिळणार आहे. या सेलमध्ये ब्ल्यूट्यूथ हेडफोनही उपलब्ध असतील.
20000mAh क्षमतेची पॉवर बँक 1799 रुपयात
2199 रुपये किंमतीची 20000mAh क्षमतेची पॉवर बँक 1799 रुपयात मिळणार आहे. तर 10000mAh क्षमतेची पॉवर 899 रुपयात मिळेल. या पॉवर बँकवर 300 रुपये सूट देण्यात आली आहे.
Mi एअर प्युरिफायर 2
'Mi एअर प्युरिफायर 2' तुम्हाला 8 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याची मूळ किंमत 9 हजार 999 रुपये आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement