एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाओमीचा खास सेल, दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर
या सेलमध्ये दररोज सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता 1 रुपयांचा फ्लॅश सेल इव्हेंट होणार आहे.
मुंबई : चीनी कंपनी शाओमीनं दिवाळीसाठी आजपासून (27 सप्टेंबर) सेल सुरु केला आहे. कंपनीनं आपल्या mi.com या अधिकृत वेबसाइटवर हा सेल सुरु केला आहे. हा सेल 29 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. यामध्ये शाओमीच्या स्मार्टफोन्ससह इतरही अनेक गॅझेटवर अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत.
या सेलमध्ये दररोज सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता 1 रुपयांचा फ्लॅश सेल इव्हेंट होणार आहे. ज्यामध्ये यूजर्स फक्त 1 रुपयात शाओमीचे प्रोडक्ट खरेदी करु शकतात.
शाओमीच्या सेलमध्ये नेमक्या ऑफर्स काय?
या सेलमध्ये शाओमी रेडमी नोट 4 (4जीबी + 64 जीबी) हा स्मार्टफोन 10,999 रुपयात उपलब्ध आहे. याची किंमत 12,999 रुपये आहे. तर mi Max 2च्या किंमतीतही दोन हजारांची सूट देण्यात आली आहे.
याशिवाय कंपनीनं इतरही गॅझेट्सवर भरघोस सूट दिली आहे.
mi राऊटर 3C हा या सेलमध्ये 899 रुपयांना उपलब्ध आहे. याची किंमत 1,199 रुपये होती.
तर इन-इअर हेडफोन प्रो एचडी हे 599 रुपयात खरेदी करता येणार आहेत.
याचसोबत शाओमीचा एअर प्युरीफायर -2 वर देखील घसघशीत सूट देण्यात आली आहे. 9,999 रुपये किंमतीचा हा प्युरीफायर 8,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर एअर प्युरीफायर बंडल 9,998 रुपयात खरेदी करता येईल. ज्याची किंमत 12,498 रुपये आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement