एक्स्प्लोर
जगातील सर्वात मोठी टेलिस्कोप चीनमध्ये कार्यरत
बिजिंग : जगातील सर्वात मोठी रेडिओ टेलिस्कोप चीनमध्ये रविवारपासून कार्यरत झाली आहे. चीनच्या नैऋत्येकडील गुईझोऊमध्ये या टेलिस्कोपची बांधणी करण्यात आली आहे.
या टेलिस्कोपच्या माध्यमातून अवकाश आणि इतर ग्रहांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. या टेलिस्कोपच्या बांधणीसाठी 1.2 अब्ज युआन खर्च करण्यात आले आहेत. या टेलिस्कोपचा आकार फुटबॉलच्या 30 मैदानांएवढा आहे.
2011मध्ये या टेलिस्कोपचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. याच्या बांधणासाठी 10 हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे. तसंच स्थलांतरीतांसाठी चीनने 270 दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement