एक्स्प्लोर
हिंदूंच्या सणांवरच बंधनं लादण्याचं धाडस का? : चेतन भगत
चेतन भगत यांनी ट्वीटमधून प्रश्न विचारलाय की, “फटाक्यांविना दिवाळी म्हणजे ख्रिसमस ट्रीविना ख्रिसमस आणि बकऱ्याच्या कुर्बानीविना बकरी इद”
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर बंदी आणल्यानंतर प्रसिद्ध लेखक चेतन भगत हे संतापले आहेत. त्यांनी ट्विटरवरुन अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “केवळ हिंदूंच्या सणांवरच बंधनं लादण्याचं धाडस का?”, असा सवाल चेतन भगत यांनी विचारला आहे.
चेतन भगत यांनी ट्वीटमधून प्रश्न विचारलाय की, “फटाक्यांविना दिवाळी म्हणजे ख्रिसमस ट्रीविना ख्रिसमस आणि बकऱ्याच्या कुर्बानीविना बकरी इद”
“आज आपल्याच देशात त्यांनी चिमुकल्यांच्या हातून फुलबाजे हिसकावून घेतले आहेत. हॅप्पी दिवाळी माझ्या मित्रांनो.”, अशीही चेतन भगत यांनी उपहासात्मक टीका केली आहे.
प्रदूषणामुळे फटक्यांवर बंदी
सुप्रीम कोर्टाने दिल्लीसह संपूर्ण एनसीआर परिसरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. प्रदूषणाचं कारण देत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
दिल्लीमध्ये दरवर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे जे प्रदूषण होतं, ते अत्यंत चिंताजनक बनत चाललं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2016 साली जगातील दिल्लीचं नावं सर्वात प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट केले होते.
2016 साली दिल्लीत 30 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी पीएम 2.5 चा स्तर 452 होतं. हे अत्यंत चिंताजनक होतं. 31 ऑक्टोबरला पीएम 2.5 चा स्तर वाढून 624 पर्यंत पोहोचलं होतं. म्हणजेच दिल्लीत हवा श्वास घेण्याच्याही योग्यतेची नव्हती.
दरम्यान, दिवाळीच्या काळात फटाके विक्रीवर बंदी आणल्याने त्याचा व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होताना दिसेल. कारण दिल्ली-एनसीआरमध्ये 50 लाख किलो फटाक्यांचा स्टॉक असून, ज्यामध्ये एक लाख किलो फटाके केवळ दिल्लीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement