एक्स्प्लोर

Whatsapp सुरक्षेवरुन लोकांमध्ये गोंधळ! या 2 Apps ला मिळतोय फायदा

वाट्सअप हेरिगिरी प्रकरणावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोक वाट्सअपला अनइंस्टॉल करुन अन्य पर्याय शोधत आहेत. याचाच फायदा अन्य 2 अॅप्सला होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : वाट्सअप मॅसेजसच्या सुरक्षेवरुन देशातच नाही तर जगभरात खळबळ माजली आहे. लोक वाट्सअपला अनइंस्टॉल करुन अन्य पर्याय शोधत आहेत. परिणामी वाट्सअप डाउनलोडींगच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. गूगल प्ले स्टोरमध्ये सर्वात जास्त डाउनलोड होणाऱ्या अॅप्समध्ये वाट्सअपची आता चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. इकनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, सॅन फ्रान्सिस्को येथे मुख्यालय असलेल्या अॅप अॅनालिटिक्स फर्म, 'अॅप एनी'ने याबद्दल माहिती गोळा केली आहे. यांच्या अहवालानुसार वाट्सअपचे हेरिगिरी प्रकरण समोर आल्यानंतर टेलीग्राम आणि सिग्नल या दोन मॅसेजिंग अॅप आणि कॉलिंग अॅप्सच्या डाउनलोड होण्याची संख्या वाढली आहे. सिग्नल iOS स्टोअरवर सिग्नल या अॅप्सची डाउनलोडींग संख्या इतकी वाढली आहे की सोशल नेटवर्किंग अॅप डाउनलोड कॅटेगरीत 'सिग्नल'चा नंबर 105 वरुन 39व्या स्थानावर गेला आहे. ही माहिती भारतातील असून 3 नोव्हेंबरला नोंदवण्यात आली आहे. गूगल प्ले स्टोअरमध्येही या अॅप्स डाउनलोड करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आठवड्यापूर्वी भारतात कम्युनिकेशन अॅप डाउनलोड कॅटेगरीत याचे स्थान 255 वे होते. 1 नोव्हेंबरला याने 31 व्या स्थानावर झेप घेतली आहे. टेलीग्राम दुसरीकडे रशियन अॅप टेलीग्रामच्या डाउनलोडींग संख्येतही वाढ झाली आहे. टेलीग्राम एका विशिष्ट प्रोटोकॉलचा वापर करते, ज्यामध्ये मॅसेज खूपवेळा तपासले जातात. यासोबतच मॅसेजची लांबीसुद्धा तपासली जाते. जर सेंडरने ३२ कॅरक्टरचा मॅसेज पाठवला असेल तर रिसीव्हरला पूर्ण मिळाला का? याची खात्री ते करतात. टेलीग्राम पाठवलेल्या मॅसेजला एक युनिक सीक्वेंस नंबर देते, जो रिसीव्हरला मिळाल्यानंतर तो सीक्वेंस क्रॉसचेक केला जातो. टेलीग्राम वर पाठवलेले मॅसेज, फाइल्स, डाटा आणि फोटो वापरकर्त्याच्या फोन नाही तर क्लाउडवर स्टोअर होतात. ज्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बॅकअपची गरज नाही. विशेष म्हणजे यावर कितीही मोठी फाइल सहज पाठवता येते. काय आहे वाट्सअपचे हेरिगिरी प्रकरण? इस्राईलची सायबर इंटेलिजेन्स कंपनी NSO ने आपल्या स्पायवेअर पेगाससचा वापर भारतात केल्याचा खुलासा वाट्सअपने केला होता. याआधारे मे महिन्यात भारतातल्या पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वाट्सअपची हेरिगिरी केली होती. या प्रकरणी वाट्सअपने एनएसओ विरोधात खटला दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget