Oppo K10 5G स्मार्टफोन भारतात लाँच, आत्ताच खरेदी केल्यास मिळणार 1500 ची सूट; जाणून घ्या सविस्तर
Oppo K10 5G Smartphone : ऑनलाइन स्टोअरद्वारे Oppo K10 5G स्मार्टफोन खरेदी करणारे ग्राहक 3 महिन्यांपर्यंत विनाशुल्क EMI आणि 1500 रुपयांची सवलत घेऊ शकतात. कसे ते जाणून घ्या
Oppo K10 5G Smartphone : Oppo ने भारतात MediaTek Dimensity 810 5G SoC आणि 6.56-इंच डिस्प्लेसह Oppo K10 5G मोबाईल लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन जूनच्या मध्यात ऑनलाइन तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोनला 2 कलरचा पर्याय असणार आहे. तसेच फक्त एक स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. ऑनलाइन स्टोअरद्वारे Oppo K10 5G स्मार्टफोन खरेदी करणारे ग्राहक 3 महिन्यांपर्यंत विनाशुल्क EMI आणि 1500 रुपयांची सवलत घेऊ शकतात. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
Oppo K10 5G किंमत, 1500 रुपयांची सवलत
याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Oppo K10 5G ची किंमत 17,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन 15 जूनपासून फ्लिपकार्ट, ऑनलाइन ओप्पो स्टोअर आणि मुख्य रिटेल स्टोअरवर दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध असेल. कलर ऑप्शन बद्दल बोलायचे झाले तर मिडनाईट ब्लॅक आणि ओशन ब्लू कलर मध्ये हा फोन उपलब्ध असेल. ऑनलाइन स्टोअरद्वारे Oppo K10 5G स्मार्टफोन खरेदी करणारे ग्राहक 3 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI असणार आहे. SBI बॅंक, Axis बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 1500 रुपयांची सवलत मिळवू शकतात. ही ऑफर बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बॅंड डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर देखील उपलब्ध आहे.
Oppo K10 5G चे स्पेसिफिकेशन्स
या फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर Oppo K10 5G मध्ये MediaTek Dimensity 810 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल, यात 8GB रॅम आणि 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम आहे आणि ते 128GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे. याच्या डाइमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 7.99 मिमी जाड आणि 190 ग्रॅम वजनाचे आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, यात HD+ रिझोल्यूशनसह 6.56-इंच डिस्प्ले आहे, 90Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 हाय कलर गॅमट आहे.
डेप्थ कॅमेरा
हे ऑल-डे एआय आय कम्फर्ट मोडसह देखील येते, जो डिस्प्ले ब्राइटनेस वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ब्राइटनेसनुसार कार्य करते. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात f/1.7 अपर्चरसह 48-मेगापिक्सलचा AI ड्युअल कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आहे. त्याच वेळी, या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सेल शूटर आहे.
बॅटरी बॅकअप
बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 5,000mAh बॅटरी आहे जी 33W SUPERVOOC तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी टाइप सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हे Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करते.
संबंधित बातमी:
6G नेटवर्क येतंय, 5G पेक्षा 50 पट जास्त असेल इंटरनेट स्पीड; जाणून घ्या काय होणार फायदे