एक्स्प्लोर
आता व्हॉट्सअॅप वापरण्याचेही पैसे मोजावे लागणार?
व्हॉट्सअॅप बिझनेससाठी भारतात नवीन अॅप लाँच करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मोठ्या संस्था आणि कंपन्या आता व्हेरिफाईड अकाऊंटच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधू शकतात.
नवी दिल्ली : फेसबुक आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही पैसे कमावण्याच्या विचारात आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने याबाबत वृत्त दिलं आहे. व्हॉट्सअॅपने बिझनेस फीचर सुरु करणार असल्याच्या वृत्ताला आता एका ब्लॉग पोस्टद्वारे दुजोरा दिला आहे.
कंपन्यांना व्हॉट्सअॅप व्हेरिफाईड अकाऊंट देणार आहे. ज्यामुळे कंपन्या ग्राहकांशी सहजपणे संवाद साधू शकतील. या फीचरची चाचणीही व्हॉट्सअॅपने भारतात सुरु केली आहे.
बिझनेस फीचर सुरु झाल्यानंतर भविष्यात कंपन्यांकडून या सेवेसाठी पैसे वसूल केले जाऊ शकतात, असं व्हॉट्सअॅपच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मॅड इडेमा यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मात्र या मुलाखतीत त्यांनी व्हॉट्सअॅपच्या व्यावसायिक धोरणांबाबत अधिक माहिती दिली नाही.
2009 साली सुरु झालेल्या व्हॉट्सअॅपला फेसबुकने 2014 साली विकत घेतलं. मात्र फेसबुकने व्हॉट्सअॅपमध्ये आतापर्यंत कोणताही बदल केला नव्हता किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसे कमावण्याचं कोणतं धोरणही जाहीर केलं नव्हतं. मात्र जुलै 2017 मध्ये कंपनीने मेसेंजर सर्व्हिसमध्ये जाहिराती दाखवणं सुरु केलं होतं.
संबंधित बातमी : व्हॉट्सअॅपवरही आता व्हेरिफाईड अकाऊंट, भारतात चाचणी सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement