Shinde Fadnavis on Uday Samant उदय सामंत कुणाचे लाडके? शिंदेंचे की फडणवीसांचे? Special Report
सध्या सगळीकडे लाडकी बहीण योजनेचा बोलबोला सुरू आहे... मात्र आज विधान परिषदेत लाडका आमदार कोण यावरून चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली...? उदयोगमंत्री उदय सामंत कुणाचे लाडके? एकनाथ शिंदेंचे की देवेंद्र फडणवीसांचे.... आदित्य ठाकरेंचे लाडके आमदार कोण? सुनील शिंदे की सचिन अहिर? हे प्रश्न कुणाला पडले आणि त्यावरच्या खुशखुशीत उत्तरांनी सभागृहात कसा हशा पिकला? पाहुयात
विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा त्रास सुरू होता...
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील आमदार सुनील शिंदे उभे राहिले..
एल्फिन्स्टनचा पूल पाडल्यानं होणारी गैरसोय, तसंच बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला..
पहिले १२ सेकंद घ्या.. त्यावर उदय सामंत आणि प्रवीण दरेकर सभागृहात बसले आहेत त्यांचे व्हिज ओव्हर लॅप करा चिट म्हणून))
आमदार सुनील शिंदे मुद्दा जास्त लांबवताहेत म्हटल्यावर सभापतींनी थेट प्रश्न विचारण्याची सूचना केली..
((१४ ते २७ सेकंदापर्यंत घ्या.. सुनील शिंदे म्हणतात प्रश्नावर येतो ))
आता प्रश्न होता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासाठी...
प्रश्न विचारताना सुनील शिंदेंनी उदय सामंतांना 'महाराष्ट्राचे लाडके' अशी उपमा दिली...आणि सभागृहात हशा पिकला...
आता आमदार सुनील शिंदे यांच्या वक्तव्यातील कोटी सगळ्यांनाच समजली असेल असं नाही...
म्हणून त्यांचे सहकारी, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी थोड्या सोप्या भाषेत विषय पुढे नेला..
text - उद्योगमंत्री कुणाचे लाडके?
photo - एकनाथ शिंदे, मध्ये उदय सामंत आणि फडणवीस
etxm vp sunil shinde ahir samant on ladka chunk 121225 MR))
((रिपोर्टर पीटूसी - उद्योग मंत्री उदय सामंत हे जरी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असले तरी ते देवेंद्र फडणवीसांच्याही तेवढेच जवळचे आहेत असं मानलं जातं. उदय सामंत काही आमदारांसह भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या अधूमधून उठतच असतात.. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेत याच संदर्भावरून उदय सामंतांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.. ))
व्हीओ-५
मराठीत एक म्हण आहे...
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी...
उदय सामंतांनी देखील एकाच बॉलमध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांची विकेट घेण्याचा प्रयत्न केला..
वरळी मतदारसंघाचे आमदार म्हणजेच , आदित्य ठाकरेंचे जास्त लाडके कोण? सुनील शिंदे की सचिन अहीर?
असा प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला..
((text - सर्वात जास्त लाडकं कोण?
photo - सुनील शिंदे आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर
००:४२ ते शेवटपर्यंत))
व्हीओ-६
सत्ताधारी आणि विरोधक ऐरवी
एकमेकांवर आगपाखड करताना पाहायला मिळतात..
मात्र अशा प्रकारे हसत खेळत राजकारण पाहणं फार दुर्मिळ होत चाललंय
ते देखील जनतेच्या प्रश्नावर चर्चा करताना...
असो...
आपआपल्या पक्षश्रेष्ठींचे लाडके असण्याबरोबरच, किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते जनतेचे लाडके असण्यामध्ये.
हे देखील प्रत्येक आमदारानं लक्षात ठेवायला हवं...
वेदांत नेब एबीपी माझा मुंबई
All Shows

































