एक्स्प्लोर

यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?

मुंबई: जर तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा तुम्हाला एखाद्याचे पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला त्याच्या अकाऊंट नंबरची गरज नाही. कारण आता आरबीआयने यूपीआय म्हणजे यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीला मंजूरी दिली असून ही नवी प्रणाली एनपीसीआय (National Payments Corporation of India)ने विकसीत केली आहे. काय आहे यूपीआय? सध्याचे बँकेचे व्यवहार कोअर बँकिंग सिस्टिम म्हणजेच एनईएफटी आणि आयएमपीएसनुसार होतात. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन बँकिंगवेळी बँक डिटेल सोबतच बँकेचा आयएफएससी कोड द्यावा लागत होता. पण यूपीआयमुळे ऑनलाईन बँकिंगमधील बरेच अडथळे कमी होणार आहेत. याचा वापर कसा कराल? यूपीआय मार्फत पैसे पाठवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर यूपीआय अॅप इन्स्टॉल करावं लागेल. उदाहरणार्थ एचडीएफसीचे पेजॅप, आयसीआयसीआय बँकेचे पॉकेट आदी बँकांचं यूपीआय सुसंगत अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावं लागेल. (समजा तुमच्याकडे एचडीएफसी अॅप आहे, तर त्यामध्ये यूपीआयचा पर्याय आहे. तसंच प्रत्येक बँकेच्या अॅपमध्ये हा पर्याय आहे) हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरची नोंद केली जाईल. यावेळी तुम्हाला तुमचा आधार नंबर देणंही गरजेचं असेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून यूनिक यूपीआय कोड पाठवला जाईल. हा नंबर म्हणजे तुमच्या बँकेचा पत्ता असेल. म्हणजे, जर तुमचं बँक खातं एसबीआयमध्ये असेल, आणि तुमचा अकाऊंट नंबर 123456789 असेल, तर तुमच्या बँकेचा पत्ता 123456789@SBI असेल. तुमच्याच मोबाईल नंबरसोबत बँकेचे नाव जोडले गेल्याने, तुम्हाला लक्षात ठेवणेही सोपे होईल. अशाच प्रकारे तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचाही यूपीआय नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. म्हणजेच समोरच्या व्यक्तीकडेही यूपीआयशी जोडलेल्या कोणत्याही बँकेचं अॅप असणं गरजेचं आहे. यूपीआयमार्फत पैसे पाठवताना यूपीआय नंबर टाकल्यानंतर, जितकी रक्कम पाठवायची आहे, ती टाकावी लागेल. यानंतर बँकेकडून तुमच्या मोबाईलवर एमपिन नंबरचा एसएमएस येईल. हा एमपिन वन टाईम पासवर्डसारखा एका व्यवहारासाठी एकदाच वापरता येईल. नवीन व्यवहारासाठी नवीन एमपिन मिळेल. त्या व्यवहारासाठी आलेला एमपिन नंबर तुमच्या मोबाईल अॅपमध्ये टाकल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एकाच दिवशी 50 हजारांपासून ते एक लाखांपर्यंतची रक्कम पाठवू शकता. याच्या वापराचे फायदे याचा सर्वात जास्त उपयोग ऑनलाईन शॉपिंगसाठी होईल. कारण, याच्या माध्यमातून तुम्ही डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीला त्याचे सहज पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीचा यूनिक आयडी नंबर द्यावा लागेल. याशिवाय याच्या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्ज आदींचे पेमेंट करू शकता. यूपीआयचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचं यूपीआय सुसंगत मोबाईल अॅप गूगल प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करावं लागेल. सध्या आंध्र बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनेरा बँक, कॅथलिक सीरियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय, टीजेएसबी, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कर्नाटक बँक, यूको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, साऊथ इंडियन बँक, विजया बँक आणि यस बँकेचे अॅन्ड्रॉइड अॅपसोबतच यूपीआयची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित बातम्या

UPI अॅप, मोबाईलवरुन पैसे ट्रान्सफर करणं आणखी सोपं!

पैसे ट्रान्सफर करणारं ‘चिल्लर’ अॅप, मोबाईलवरुन पैसे ट्रान्सफर करणं आणखी सोपं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget