एक्स्प्लोर

Vivo V21 5G स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिएंट 'या' दिवशी भारतात लॉन्च होणार; वाचा किंमत आणि फीचर्स?

Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

Tech News : स्मार्टफोन कंपनी Vivo ने अलीकडेच आपला स्मार्टफोन Vivo V21 5G भारतात लॉन्च केला आहे. त्याचबरोबर आता कंपनी आपले नवीन कलर व्हेरिएंट आणत आहे. आता तुम्हाला हा Vivo स्मार्टफोन निऑन स्पार्क कलर ऑप्शन मध्येही मिळेल. कंपनीने नुकताच हा फोन डस्क ब्लू, सनसेट डिझेल आणि आर्टिक व्हाईट कलर ऑप्शनसह लॉन्च केला होता. स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

काय आहे किंमत?

8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह Vivo V21 5G व्हेरिएंटची किंमत 29,990 रुपये आहे. त्याचबरोबर त्याच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 32,990 रुपये ठेवण्यात आली आहे. असे मानले जाते की कंपनी याच किंमतीच्या आसपास नवीन कलर व्हेरियंट लाँच करू शकते.

स्पेसिफिकेशन

Vivo V21 5G मध्ये 6.44-इंच फुल HD+ AMOLED AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 1080x2404 पिक्सेल आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. यात 500 nits चा पीक ब्राईटनेस आहे. फोन MediaTek Dimensity 800U प्रोसेसरने सुसज्ज आहे. Android 11 आधारित Funtouch OS 11.1 वर कार्य करते. यात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे.

कॅमेरा स्पेसिफिकेशन

फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, Vivo V21 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देखील देण्यात आला आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

4,000mAh ची दमदार बॅटरी

पॉवरसाठी Vivo V21 5G स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. कंपनीचा दावा आहे की हा स्मार्टफोन अर्ध्या तासात 60 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज होईल. हा फोन सनसेट डॅझल, डस्क ब्लू आणि आर्कटिक व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये इंडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M42 5G शी स्पर्धा करेल

Vivo V21 5G ची भारतीय बाजारात Samsung Galaxy M42 5G सोबत स्पर्धा होईल. या फोनमध्ये 6.6 इंच HD + सुपर AMOLED इन्फिनिटी-यू डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित वन यूआय 3.1 वर काम करतो. परफॉर्मन्ससाठी, त्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. या फोनची खासियत म्हणजे युजर्सना नॉक्स सिक्युरिटी आणि सॅमसंग पे सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्याABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP MajhaSupriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीतील आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब; शिंदे, गोगावलेंची एन्ट्री, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
Santosh Deshmukh Case: बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.