एक्स्प्लोर
डाऊन पेमेंटशिवाय टोयोटा इनोव्हा क्रिस्टा खरेदी करता येणार!
'ड्राईव्ह द नेशन' या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना इनोव्हा क्रिस्टावर 100 टक्के ऑन-रोड फायनान्स, इश्युरन्स, अॅक्सेसरीज आणि अतिरिक्ट वॉरंटी देण्यात येणार आहे.
मुंबई : टोयोटाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खास ऑफर नुकतीच लाँच केली आहे. 'ड्राईव्ह द नेशन' या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना इनोव्हा क्रिस्टावर 100 टक्के ऑन-रोड फायनान्स, इश्युरन्स, अॅक्सेसरीज आणि अतिरिक्ट वॉरंटी देण्यात येणार आहे.
टोयाटाने 2016 साली ड्राईव्ह द नेशन कॅम्पेन सुरु केलं होतं. या कॅम्पेनमध्ये इटियॉस आणि कोरोला एल्टिस यांचा समावेश होता. आता यामध्ये इनोव्हा क्रिस्टाचा देखील समावेश करण्यात आला आहे.
या स्कीममध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आठ वर्षासाठी 100 टक्के ऑन-रोड कर्ज देण्यात येणार आहे. म्हणजेच कोणतंही डाऊन पेमेंट न करता टोयोटा इनोव्हा क्रिस्टा तुम्ही घरी आणू शकता. सर्वसामान्यपणे कारवर सात वर्षासाठी कर्ज देण्यात येतं. यामध्ये एक्स शोरुम किंमतीवर 85 टक्के कर्ज दिलं जातं. पण ड्राईव्ह द नेशन या अंतर्गत इनोव्हा क्रिस्टावर आठ वर्षासाठी फायनान्स देण्यात येतं.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टामध्ये एक पेट्रोल आणि दोन डिझेल इंजिन उपलब्ध आहेत. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 2.7 लीटर इंजिन तर डिझेलमध्ये 2.4 लीटर आणि 2.8 लीटर इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसंच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचाही पर्याय आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement