Toyota Fortuner 2021 आणि Legender भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
दोन्ही मॉडेल्समध्ये ग्राहकांना शार्प-लुकिंग प्रोजेक्टर हेड लँप, एल-आकाराचा डीआरएल, छोटं ब्लॅक-आऊट मेश ग्रिल आणि अग्रेसिव्ह फ्ंट बंपर देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : टोयोटाने नवीन कार Toyota Fortuner Facelift लॉन्च केली आहे. भारतात टोयोटा फॉर्च्युनर फेसलिफ्ट (Toyota Fortuner Facelift ) सह लेजेंडर (Legender) देखील लॉन्च केली आहे. या दोन्ही मॉडेल्सच्या किंमतीं पाहिल्या तर, लेजेंडर 37.58 लाख रुपये आहे, तर टोयोटा फॉर्च्युनर फेसलिफ्ट 29.98 लाखांना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांना आजपासून या दोन्ही गाड्यांची बुकिंग करता येणार आहे. या दोन्ही गाड्यांना आकर्षक लूक देण्यात आला आहे. Toyota Fortuner च्या डिझाईनला पूर्णपणे नवीन लूक देण्यात आला आहे. फेसलिफ्ट आणि लेजेंडर या दोनही मॉडेल्स बोल्ड आणि स्टाईलिश दिसतात. याशिवाय या मॉडेल्समध्ये वेंटिलेटेड सीट्स आणि कनेक्टेड फीचर्सही देण्यात आले आहेत. इंटरनेटच्या मदतीने आपण गाडीमधील कनेक्टेड फीचर्सचा वापर करु शकतो. या नव्या फीचर्समुळे ग्राहकांना ड्रायव्हिंगचा पूर्वीपेक्षा चांगला अनुभव घेता येणार आहे.
या मॉडेल्समध्ये कंपनीने पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय ग्राहकांना दिला आहे. जर आपण पेट्रोल युनिटबद्दल चर्चा केली तर त्यात 2.7 लीटर इंजिन आहे. जे जास्तीत जास्त 164 बीएचपीची उर्जा आणि 245 एनएमची पीक टॉर्क तयार करु शकतं. टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टमध्ये 2.8 लिटर टर्बो डिझेल इंजिन दिले गेले आहे. जे 204 बीएचपीची उर्जा आणि 500 एनएम पर्यंत पीक टॉर्क जनरेट करू शकते.
दोन्ही मॉडेल्समध्ये ग्राहकांना शार्प-लुकिंग प्रोजेक्टर हेड लँप, एल-आकाराचा डीआरएल, छोटं ब्लॅक-आऊट मेश ग्रिल आणि अग्रेसिव्ह फ्ंट बंपर देण्यात आला आहे.
Toyota Fortuner फेसलिफ्ट- पेट्रोल
- 4X2 मैनुअल: 98 लाख रुपये (एक्स-शोरूम)
- 4X2 ऑटो: 57 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Toyota Fortuner फेसलिफ्ट- डीजल
- 4X2 मैनुअल: 48 लाख रुपये (एक्स-शोरूम)
- 4X2 ऑटो: 84 लाख रुपये (एक्स-शोरूम)
- 4X4 मैनुअल: 14 लाख रुपये (एक्स-शोरूम)
- 4×4 ऑटो: 43 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Fortuner Legender 4X2 ऑटो: 37.58 लाख रुपये (एक्स-शोरूम)