Airtel 5G : एअरटेल 5G सोबत 1983 क्रिकेट विश्व चषकातील सामन्यांचा स्टेडियम अनुभव, कपिल यांची नाबाद 175 धावांची खेळीही पुन्हा प्रकाशात
एअरटेलकडून करण्यात आलेला 1983 विश्वचषकातील 175 खेळीचा रिप्लेड अनुभव आणि कपिल देव यांचा 5G पावर्ड होलोग्राम व्हिडीओ एंटरटेनमेटच्या भविष्याची झलक दाखवतात.
Airtel 5G : क्रिकेटवेड्या भारताला क्रिकेटचं खरं वेड लागलं ते 1983 नंतरच... कारण अगदी नवख्या अशा भारतीय संघाने बलाढ्य संघाना मात देत 1983 साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. यावेळी कर्णधार कपिल देव यांनी केलेली कामगिरी म्हणजे अगदी दमदार. त्यांच्या या खेळीत झिम्बाब्वे संघाविरोधात त्यांनी ठोकलेल्या नाबाद 175 धावांनी भारताचं विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवलं. पण त्यादिवशी बीबीसी या तत्कालीन एकमेव ब्रॉडकास्ट चॅनेलचा संप असल्याने ही खेळी रेकॉर्ड झाली नव्हती. त्यामुळे भारती एअरटेलने 1983 क्रिकेट विश्वचषकातील याच कपिल देव यांच्या खेळीचा अनुभव पुन्हा एकदा भारतीयांना दाखवण्यासाठी एक उत्तम सोय केली आहे.
एअरटेल या दिग्गज टेलीकॉम कंपनीने ‘175 रीप्लेड’ च्या 4K अनुभवातून भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील 1983 च्या सामन्यातील महत्वपूर्ण हायलाइट्स जिवंत केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी महान क्रिकेटर कपिल देव यांच्या होलोग्रामशी देखील यावेळी बातचीत करण्याचा अनुभव उपस्थितांनी केला. एअरटेलने आपल्या तांत्रिक क्षमतांची चाचणी करत काही निवडक प्रक्षकांना 5G इनबिल्ड स्मार्टफोन दिला. ज्यामध्ये 1 Gbps हून अधिकच्या गतीचं आणि 20 मिलीसेकंदच्या कमी लेटेन्सीता अनुभव केला जाऊ शकत होता. यामुळे 50 हून अधिक यूजर्सना सामन्याच्या 4K व्हिडीओचा अनुभव घेता आला. यावेळी यूजर्सकडे अनेक कॅमरा अँगल, 360-डिग्री इन-स्टेडिया व्ह्यूव, शॉट अॅनालिसिस आणि स्टॅटिस्टिक्ससह रियल-टाईम एक्सेस ही होता. ज्यामुळे हा संपूर्ण अनुभव अधिक रोमहर्षक झाला. इमर्सिव्ह व्हिडिओ एंटरटेनमेंटचं भविष्य बदलणं या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनावर भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखों म्हणाले,“5G ची गती आणि मिलीसेकंद लेटेन्सी आपलं मनोरंजन विश्वच बदलणार आहेत. आजच्या या कार्यक्रमातून आम्ही 5G डिजीटल विश्वाच अत्याधुनिक बदल आणि अप्रतिम अनुभवाच्या सर्व सीमा खोलण्याची सुरुवात करुन दिली आहे.”
महान क्रिकेटपटू कपिल यांच्या होलोग्रामशी यावेळी रिअल टाईम बातचीत झाल्याने या कार्यक्रमाचा उत्साह आणखी वाढवला. कपिल देव यांचा एक 5G संचालित व्हर्चुवल अवतार स्टेजव प्रकट झाला. ज्याने उपस्थितांसोबत बातचीत केली. यावेळी नाबाद 175 धावांच्या खेळीतील काही महत्त्वाच्या गोष्टी, यादगार अनुभव साऱ्याचाच उलगडा झाला. “मी 5G टेक्नोलॉजीच्या ताकदीने चकीत आहे. मी माझा डिजीटल अवताराला उपस्थितांशी बोलताना पाहतो आहे. हे म्हणजे अगदी मी आता तिथे उपस्थित आहे, अशाप्रमाणेच आहे. त्यामुळे मी या अद्भुत अनुभवासह माझ्या कारकिर्दीतील एका महत्त्वपूर्ण खेळीला पुन्हा जिवंत करण्यासाठी एअरटेलचं धन्यवाद करतो.” अशा शब्दात कपिल देव यांनी आपला अनुभव सांगितला.
रणदीप सेखों हे पुढे बोलताना म्हणाले, “5G आधारित होलोग्रामच्या मदतीने आपण व्हर्चुअल अवताराला कुठेही घेऊन जाण्यास सक्षम आहोत. हे मीटिंग, काँन्फन्स आणि लाइव्ह बातम्यासाठी एक गेम-चेंजर ठरणार आहे. त्यामुळे याचा वापर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जाईल. आधुनिक डिजीटल युगात भारताच्या अभिनव उपयोगासाठी ही एक दमदार अशी पाईपलाइन ठरणार आहे. यासाठी 5G सोबत एअरटेल संपूर्णपणे तयार आहे. ”
जसजसा देश 5G स्पेक्ट्रमजवळ पोहोचत आहे, एअरटेल टेक्नोलॉजी सेगमेंटमध्ये अधिक जोर लावत आहे. यातून 5G ग्राहकांसाठी काय करु शकतं याची एक झलक ग्राहकांना दिसत आहे. इन-स्टेडिया अनुभव मागील एक वर्षापासून टेल्को द्वारा आयोजित अनेक 5G सेवांमधील आधुनिक अनुभव आहे. सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीने एअरटेल 5G वर लाईव्ह क्लाउड गेमिंग इव्हेंटचं होस्टिंग देखील केलं होतं. ज्यात मॉर्टल आणि माम्बा सारखे प्रो-गेमर्स सामील होते.
पुढील महिन्यात एअरटेलने कोलकात्याच्या बाहेरील भागात पहिलं ग्रामीण 5G परीक्षण केलं. कंपनीने #5GforBusiness हा ट्रेन्डही सुरु केला असून. 5G आधारित विविध गोष्टींचं परीक्षण करण्यासाठी काही प्रमुख टेक्नोलॉजी ब्रँन्ड्स आणि कंपन्यांशी भागिदारी केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha