(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Airtel Jio Prices Hike : पुन्हा एकदा महागणार Airtel, Jio आणि VI चे रिचार्ज प्लॅन; किंमत किमान 10-12 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
Airtel Jio Prices Hike : दिवाळीच्या मुहूर्तावर Airtel, Reliance Jio आणि VI च्या किमती पुन्हा एकदा महागणार आहेत.
Airtel Jio Prices Hike : Airtel, Reliance Jio and Vodafone Idea यांसारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या तिन्ही कंपन्या दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमती (Prepaid plans price) वाढवू शकतात. कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन 10 ते 12 टक्क्यांनी महागणार आहेत. यापूर्वी या तिन्ही कंपन्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये प्रीपेड प्लॅन्स महाग केले होते.
ईटी टेलिकॉमच्या या अहवालात अमेरिकन इक्विटी रिसर्च फर्म, William O’ Neil कंपनीच्या भारतीय युनिटमधील इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांनी हवाला दिला आहे. टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा 10 ते 12 टक्क्यांनी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे Airtel, Jio आणि Vodafone Idea चे ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) अनुक्रमे 200 रुपये, 185 रुपये आणि 135 रुपये वाढणार आहेत.
नोव्हेंबर 2021 मध्ये, Airtel आणि Vodafone Idea ने प्रीपेड प्लॅन्स 20-25 टक्क्यांनी वाढवले होते. यानंतर Reliance Jio कडूनही असाच निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीमुळे प्लॅन 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढला. Airtel चा 2GB per day प्लॅन 84 दिवसांच्या Validity सह 698 रुपयांवरून 839 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
Airtel चे सीईओ यांनी दिले संकेत
अलीकडेच एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले होते. कंपनीच्या सीईओने सांगितले की एअरटेलला प्रति यूजर्स सरासरी महसूल वाढवायचा आहे, ज्यासाठी 2022 मध्ये स्किम पुन्हा एकदा महाग केल्या जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :