एक्स्प्लोर
Advertisement
शेजाऱ्यांचं वाय-फाय चोरुन वापरणं इस्लामविरोधी, दुबईतील धर्मसंस्थेचा फतवा
दुबई : शेजाऱ्याचं वाय-फाय चोरुन वापरण्याविरोधात दुबईमधील एका धर्मसंस्थेने एक अजब फतवा जारी केला आहे. शेजाऱ्याचं वाय-फाय चोरुन वापरणं हे इस्लामचं पालन न करण्यासारखं आहे, असं म्हणणं या धर्मसंस्थेचं आहे.
इस्लामिक अफेअर्स अँड चॅरिटेबल अॅक्टिव्हिटीज डिपार्टमेंट असं फतवा काढणाऱ्या संस्थेचं नाव आहे. विशेष म्हणजे या संस्थेने हा फतवा वेबसाईटवर अपलोड करुन जारी केला आहे. फतवा जारी केल्यानंतर अनेकांनी वेगवेगळे प्रश्नही विचारले आहेत.
फतव्यात काय म्हटलं आहे?
“तुमचा शेजारी तुम्हाला त्यांचं वाय-फाय वापरण्यास परवानगी देत असेल, तर वाय-फाय वापरण्यास हरकत नाही. मात्र, शेजाऱ्याच्या परवानगीविना त्यांचं वाय-फाय वापरु नये.”
इस्लामिक अफेअर्स अँड चॅरिटेबल अॅक्टिव्हिटीज डिपार्टमेंट या धर्मसंस्थेची स्थापना 1969 साली झाली असून इस्लामी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याचं उद्दिष्ट या संस्थेचं आहे. कुराण आणि इस्लाम धर्माचा प्रसार, हे मूळ ध्येय आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement