एक्स्प्लोर
जगातील सगळ्यात वेगवान एसडी कार्ड आणि कार्ड रीडर लाँच
मुंबई: सोनी इंडियानं मंगळवारी जगातील सर्वात वेगवान एसएफ-जी सीरीजचं एसडी कार्ड लाँच केलं. व्यावसायिक फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांना लक्षात ठेऊन हे एसडी कार्ड तयार करण्यात आलं आहे. हे एसडी कार्ड हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे.
एसएफ-जी सीरीजची राईट स्पीड 299MB / प्रति सेंकद आहे. जे डिजिट इमेजिंग डिव्हाइसच्या फास्टेस्ट परफॉर्मन्सला सपोर्ट करतं. ज्यामुळे हाय-रेझ्युलेशनचे फोटो बऱ्याच वेळापर्यत शूट करता येऊ शकतात. हे बफर क्लिअर करण्यासाठी लागणारा वेळही कमी करतं.
हे एसडी कार्डं 32 जीबी, 64 जीबी, आणि 128 जीबी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. ज्याची दर सेंकदाला 300 एमबी रीड स्पीड एवढी क्षमता आहे. ज्यामुळे मोठ्या फाईल कमी वेळात कम्प्युटरवर ट्रान्सफर करता येणार आहे.
32 जीबी एसडी कार्डची किंमत 6,700 रुपये, 64 जीबी एसडी कार्डची किंमत 11,000 रुपये तर 128 जीबी एसडी कार्डची किंमत 19,900 रुपये आहे. सर्व कार्डसोबत पाच वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. 3 एप्रिलपासून हे एसडी कार्ड विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
एमआरडब्ल्यू-एस 1 टी1 या कार्ड रीडरची किंमत 2,300 रुपये असणार आहे. याची एक वर्षाची गॅरंटी असणार आहे. हे देखील 3 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement