एक्स्प्लोर
स्नॅपडीलनं रचला विक्रम, 'या' स्मार्टफोनला जबदरस्त मागणी
मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलनं एक अनोखा विक्रम रचला आहे. कंपनीच्या ‘Unbox Diwali sale’ या ऑफरमध्ये पहिल्या 16 तासात 11 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी मोबाइल फोनसाठी नोंदणी केली आहे.
जवळजवळ 1 लाख मोबाइल फोनची विक्री देखील झाली आहे. कंपनीनं रविवारी याबाबत माहिती दिली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुरु झालेल्या विक्रीमध्ये सॅमसंग J2 आणि LeEco Le मॅक्स 2 यांची सर्वात जास्त मागणी आहे. मोबाइल फोनप्रमाणेच इतर उपकरणं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचर यांची देखील ऑनलाईन मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
स्नॅपडीलचे अधिकारी सौरभ बन्सल यांचं म्हणणं आहे की, 'आम्ही दिवाळी अनबॉक्स सेलच्या सुरुवातीच्या तासांमध्ये आम्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही फारच उत्साहित झालो आहोत. त्यामुळे पुढील काही दिवसात अधिक चांगल्या
ऑफर ग्राहकांच्या भेटीला नक्कीच येतील.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement