एक्स्प्लोर
सॅमसंगचा धुमाकूळ, 4,590 रुपयात 4G फोन लाँच, भन्नाट फीचर्स

मुंबई : मोबाईल जगतात धूमाकूळ घालणाऱ्या सॅमसंगने युझर्सना मेगा गिफ्ट दिलं आहे. सॅमसंगने अत्याधुनिक 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे सॅमसंगने लाँच केलेल्या Z2 या स्मार्टफोनची किंमत अवघी 4 हजार 590 रुपये आहे. या फोनमध्ये कोरिअन कंपनी Tizen ची ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसंच यामध्ये VoLTE व्हिडीओ कॉलिंग सुविधाही आहे. या फोनमध्ये 'माय मनी ट्रान्सफर' हे अप मोबाईल बँकिंगचं काम करेल. महत्त्वाचं म्हणजे या अपमुळे तुमच्याकडे जरी डेटा पॅक नसेल, तहीही तुम्ही नेटबँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकाल. हे अप सॅमसंगने भारतात बनवलं आहे. या फोनमध्ये 12 भारतीय भाषा आहेत. याशिवाय हा फोन तुमचा 40 टक्के डेटा वाचवू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. या फोनमध्ये S-Bike सारखंही फिचर उपलब्ध आहे. हा फोन 4 इंच असून 5MP एलईडी फ्लॅशसह कॅमेरा आहे. या फोनचा प्रोसेसर 1.5GHz इतका आहे. 'सॅमसंग Z2'ची रॅम 1GB इतकी आहे. या फोनची मेमरी 8GB इतकी असून ती 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. 'सॅमसंग Z2' चे फीचर्स *4 इंच फोन, 5MP एलईडी फ्लॅशसह कॅमेरा *प्रोसेसर 1.5GHz *रॅम 1GB * इंटर्नल मेमरी 8GB, 128 GB पर्यंत वाढवता येणं शक्य *बॅटरी -1,500mAh *किंमत - 4,590 रुपये https://www.youtube.com/watch?time_continue=38&v=p2KQCxVE2Uo
आणखी वाचा























