Samsung Galaxy Watch 5 आणि Watch 5 Pro ची प्री-बुकिंग सुरू, 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी
Samsung Galaxy Watch 5 Pre Booking : Samsung Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro ची भारतात प्री-बुकिंग सुरू झाली आहे. यावर भन्नाट ऑफर्सही सुरु आहेत.
Galaxy Watch 5 Pro Pre Booking : भारतात Samsung Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro ची भारतात प्री-बुकिंग सुरू झाली आहे. सॅमसंगने (Samsung) काही काळाआधीच Galaxy Z Fold 4, Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Buds 2 Pro यांच्यासोबत Galaxy Watch 5 सीरीज जागतिक स्तरावर लाँच केलं आहे. Samsung Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro भारतात किती किमतीला उपलब्ध आहे, त्यावर कोणत्या ऑफर्स आहेत जाणून घ्या सविस्तर...
भारतातील किंमत आणि ऑफर
तुम्हाला Samsung Galaxy Watch 5 आणि Samsung Galaxy Watch 5 Pro ची प्री-बुकींग Samsung.com या अधिकृत वेबसाईटवर करता येईल. याशिवाय तुम्ही ऑफलाईल स्टोर्समध्ये जाऊनही प्री-बुकींग करु शकता. Samsung Galaxy Watch 5 तुम्हाला 27,999 हजार रुपयांनी उपलब्ध असेल तर, Samsung Galaxy Watch 5 Pro 44,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Galaxy Watch 5 (40 मिमी) ब्लूटूथ-ओनली मॉडलची किंमत 27,999 रुपये आहे. याच्याच LTE व्हर्जन तुम्हाला 32,999 रुपयांना खरेदी करता येईल. Galaxy Watch 5 (40 मिमी) ब्लूटूथ-ओनली व्हर्जनची किंमत 30,999 रुपये आहे. याच्याच LTE व्हर्जनची किंमत 35,999 रुपये आहे. Galaxy Watch 5 Pro (45 मिमी) ब्लूटूथ-ओनली व्हर्जन तुम्हाला 44,999 रुपयांना उपलब्ध असेल, तर याचं LTE व्हर्जन तुम्हाला 49,999 रुपयांना खरेदी करता येईल.
5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी
Galaxy Watch 5 (40 मिमी) तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ग्रॅफाइट, पिंक गोल्ड आणि सिल्वर रंगात उपलब्ध असेल Galaxy Watch 5 (44 मिमी) ग्रॅफाइट, सॅफायर आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध असेल. काही बँकांच्या कार्डवर तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे. तर Galaxy Watch 5 Pro दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल, यामध्ये ब्लॅक टाइटेनियम आणि ग्रे टाइटेनियम रंगात उपलब्ध असेल. यावर काही बँकांच्या कार्डवर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे.
Samsung Galaxy Watch 5 प्री-बुक करताना तुम्हाला Galaxy Buds 2 वर खास ऑफर देण्यात येईल. तुम्हाला 2,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करताना 5,000 रुपयांपर्यंतची ऑफर दिली जात आहे. त्यामुळे या संधीचा नक्की लाभ घ्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
