एक्स्प्लोर
‘गॅलेक्सी S9’ आणि ‘S9 प्लस’ स्मार्टफोनचं भारतातील बुकिंग सुरु
जीएसएमए या तंत्रज्ञानविषयक संस्थेकडून ‘वर्ल्ड मोबाईल काँग्रेस’चं आयोजन केले जाते. युरोपमधील विविध देशांमध्ये दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
नवी दिल्ली : मोबाईल कंपन्यांमधील जायंट मानल्या जाणाऱ्या ‘सॅमसंग’ने बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये ‘गॅलेक्सी S9’ आणि ‘S9 प्लस’ हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. येत्या 16 मार्चपासून जगभरातील मोबाईल बाजारात हे हँडसेट ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र अॅडव्हान्स बुकिंग सुरु करण्यात आली आहे.
सॅमसंगच्या वेबसाईटवर दोन हजार रुपये भरुन दोन्ही स्मार्टफोन बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
गॅलेक्सी S9 स्मार्टफोनची किंमत सुमारे 46 हजार 500 रुपये असेल, तर S9 प्लस स्मार्टफोनची किंमत सुमारे 54 हजार रुपये असेल. नेमकी किंमत अद्याप जाहीर झाली नसून, भारतात दोन्ही स्मार्टफोनची किंमत इतर देशांच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे.
गॅलेक्सी S9 चे फीचर्स –
- 5.8 इंचाचा स्क्रीन
- 2960 x1440 पिक्सेल रिझॉल्युशन
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
- Exynos प्रोसेसर व्हर्जन
- 4 जीबी रॅम
- 64 जीबी इंटरनल स्टोरेज
- सिंगल लेन्स कॅमेरा
- 6.2 इंचाचा स्क्रीन
- 2960 x1440 पिक्सेल रिझॉल्युशन
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
- Exynos प्रोसेसर व्हर्जन
- 6 जीबी रॅम
- 64 जीबी इंटरनल स्टोरेज
- ड्युअल लेन्स कॅमेरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement