एक्स्प्लोर
Advertisement
srt स्मार्टफोनवर खास ऑफर, सचिनच्या हस्ते लाँचिंग
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्मार्टोन कंपनीनं मिळून srt हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. भारतीय स्टार्टअप कंपनी loT ने या स्मार्टफोनच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला एक अनोखी मानवंदना दिली आहे. सचिन या स्मार्टफोनचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. srt स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.
हा स्मार्टफोन आजपासून (गुरुवार) फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याच्या 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रु. आहे. तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे.
हा स्मार्टफोन थेट शाओमीच्या रेडमी नोट 4 आणि मोटो G5 ला टक्कर देईल असं मानलं जात आहे. या स्मार्टफोनसोबत 1500 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच सचिन तेंडुलकरच्या ब्रॅण्डचं बॅक कव्हरही देणार आहे. अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या यूजर्सना 5 टक्के कॅशबॅकही मिळणार आहे.
srt स्मार्टफोनचे खास फीचर:
या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम असणार आहे. तसेच अँड्रॉईड 7.0 नगेटवर हा स्मार्टफोन आधारित असणार आहे.
यामध्ये 5.5 इंच स्क्रिन असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे.
या स्मार्टफोनमध्ये 1.8GHz ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 652 SoC प्रोसेसर आहे. तर 4 जीबी रॅम आहे.
यात 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
यामध्ये रिअर पॅनलवर फिंगर सेंसरही देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAh आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement