JioPhone Next : 'रिलायन्स जिओ'चा सर्वात स्वस्त 'जिओ फोन नेक्स्ट' आता मिळणार मोबाईल स्टोअरमध्ये, जाणून घ्या किंमत
'रिलायन्स जिओ'चा सर्वात स्वस्त जिओ फोन नेक्स्ट (JioPhone Next) आता मोबाईल स्टोआरमध्ये मिळणार आहे. खरेदीदार गेल्या अनेक दिवसांपासून या मोबाईलची वाट पाहत होते. ग्राहकांना आता मोबाईल स्टोअरमधून हा फोन खरेदी करता येणार आहे.
![JioPhone Next : 'रिलायन्स जिओ'चा सर्वात स्वस्त 'जिओ फोन नेक्स्ट' आता मिळणार मोबाईल स्टोअरमध्ये, जाणून घ्या किंमत Reliance Jio launch jio phone next Find out jio phone next price and jio phone next specifications JioPhone Next : 'रिलायन्स जिओ'चा सर्वात स्वस्त 'जिओ फोन नेक्स्ट' आता मिळणार मोबाईल स्टोअरमध्ये, जाणून घ्या किंमत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/485c29a9f217f49941b7d3ab4f61d7bc_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
JioPhone Next : 'रिलायन्स जिओ'ने (Reliance Jio) भारतीय बाजारात आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन जिओ फोन नेक्स्ट (Jio Phone Next) लाँच केला आहे. जिओने गुगलसोबत भागीदारी करून हा मोबाइल तयार केला आहे. भारतीय खरेदीदार गेल्या अनेक दिवसांपासून या मोबाईलची वाट पाहत होते. ग्राहकांना आता आपल्या जवळच्या मोबाईल स्टोअरमधून हा फोन खरेदी करता येणार आहे.
जिओ फोन नेक्स्टची किंमत 6499 पासून सुरू होत असून ग्राहकांना हा फोन घेण्यासाठी हप्त्यांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 18 किंवा 24 महिन्यांसाठी 1999 रूपये महिन्याला हप्ता भरून हा फोन घेता येणार आहे. जिओ फोन नेक्स्ट हा पहिला मोबाईल आहे, ज्यामध्ये प्रगती OS हे फिचर्स वापरण्यात आले आहे. हे Android चे व्हर्जन असून ते फक्त जिओ फोन नेक्स्टसाठीच बनवण्यात आले आहे. या मोबाईलमध्ये ग्राहकांना 5. 45 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, मल्टी-टॉर्च स्क्रीन, कॉर्निंग गोरिला ग्लाससह Google आणि जिओकडून प्री-लोडेड अॅप्स मिळणार आहेत.
फिल्टर फिचर्स कॅमेरा
जिओ फोन नेक्स्टच्या मोबाईलमध्ये 13 MP बॅक कॅमेरा आणि 8 MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय कॅमेऱ्यात अनेक फिल्टर फिचर्स उपलब्ध आहेत. या मोबाईलमध्ये 10 भाषांचे भाषांतर आणि वापर करण्याचा पर्याय आहे. याबरोबरच कॅमेर्याने कोणत्याही अज्ञात भाषेचे तुमच्या स्वतःच्या भाषेत भाषांतर करू शकता. या मोबाईलमध्ये 3500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
जिओ फोन नेक्स्टमध्ये 2GB RAM आणि 32GB ROM आहे. याबरोबरच वेगळे मेमरी कार्ड वापरून 512 GB पर्यंत जिओ फोन नेक्स्ट वाढवता येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- EV products : जिओ-बीपी आणि महिंद्रा ग्रुप इलेक्ट्रिक वाहनांसह कार्बन सोल्यूशनसाठी एकत्र
- मोबाईल बँकिंग आणि UPI वापरत असाल तर सावधान! हा मालवेअर करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे
- Samsung Galaxy F23 5G : लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, 'हे' असतील फिचर्स
- OnePlus Nord 3 : 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, जाणून घ्या फीचर्स...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)